Shivsena leader Jagdish Dhodi Not Reachable: महायुतीचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीनाट्यानंतर जिल्ह्यातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. वनगांप्रमाणेच शिवसेना नेतेही जगदीश धोडी यांनीही
जगदीश धोडी यांनी बोईसर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार विलास तरे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे शिवसेना उमेदवारासह वरिष्ठांचीही डोकेदुखी वाढली आहे. राज्यात सध्या अनेकांचे बंड शमवण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठांकडून जोर लावला जात आहे. असे असताना बंडोबा जगदीश धोडी सध्या नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे.
यंदाच्या जागावाटपाच्या वाटाघाटीत पालघरमधील दोन जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. यातच शिवसेनेकडून दोन्ही जागांवर आयात उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. काही दिवसांपूर्वीच श्रीनिवास वनगा यांनी आपल्याला उमेदवारी न मिळाल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही नॉट रिचेबल असल्याचे वृत्त होते. मुख्यमंत्री शिंदेंनी आयात उमेदवारांना संधी दिल्याबद्दल धोडी यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडोबा थंड न झाल्यास युतीला मोठा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात वरिष्ठ नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी कऱण्याचा प्रयत्न सुरु आहे.