Baramati Rohit Pawar On Sharad Pawar Govind Baug Diwali Padwa : राष्ट्रवादी काँग्रेसकडून दरवर्षी दिवाली पाडवा मोठ्या साजरा केला जातो. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता अजितदादा आणि शरद पवार यांनी वेगवेगळा पाडवा साजरा केला आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, आता दादांनी वेगळा निर्णय घेतला असेल, त्याविषयी आपल्याला जास्त बोलता येणार नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र इथेही लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सगळ्यात खास महत्वाची गोष्ट अशी आहे की, नेते कमी आणि सामान्य लोक सर्वात जास्त आहेत. तिकडे नगरसेवक मोठे मोठे नेते, व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर असतील, मात्र लोकशाहीमध्ये सामान्य लोकांची ताकद ही पैशापेक्षा खूप मोठी आहे हे महत्त्वाचे, असे रोहित पवार म्हणाले.
१७० ते १८० आमदार महाविकास आघाडीचे राज्यात निवडून येतील. तुम्ही पाहाल. एक सुप्त लाट आहे. लोक योग्य निर्णय घेणार आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांनी कारभार केला आहे, तो लोकांना माहित आहे. शेतकरी अडचणीत आहे. कालच सोयाबीनचे दर २२०० रुपयांवर घसरले आहेत, मात्र तेलाचे दर मात्र खूप महागले आहेत. दिवाळीचे घर पूर्वी जसे रंगवले जायचे, रंगरंगोटी केली जायची आज तशी दिसत नाही, कारण लोकांच्या हातात पैसा नाही, असेही रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar : साहेबांनी पाडवा सुरू केला, त्यांचं बोट धरून अजितदादा आले; आता शरद पवार जिथे उभे राहतात, तिथेच लोक भेटायला जातात
देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर महाराष्ट्र द्वेषाची पट्टी
महायुतीचे सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्वे केलेल्या एजन्सीने कालच रिपोर्ट दिला आहे की, गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झालेली आहे आणि गुजरात मात्र पुढे गेलेले आहे. त्यामुळे भाजपचे सरकार जेव्हा असते तेव्हा महाराष्ट्रासाठी काम करत नाही, ते गुजरातसाठी काम करते. खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर महाराष्ट्र द्वेषाची पट्टी आहे. महाराष्ट्र स्वाभिमानाची पट्टी नाही, त्यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी आहे, असे म्हणावे लागेल.