हिट अँड रन, बोलेरोने रस्त्यावर उभे असलेल्या पाच जणांना चिरडलं, थरकाप उडवणारा अपघात

नंदुरबार तालुक्यातील लॉय पिंपलोद गावात 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ज्यात एका वेगवान बोलेरोने 3 मोटारसायकला चिरडले. यामध्ये 5 जणांचा मृत्यू आणि 1 गंभीर जखमी झाला. दिवाळीच्या सणाला मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला 3 मोटरसायकलसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडल्याने 5 जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली 2 नोव्हेंबर रात्री आठ वाजेदरम्यान घडली आहे. दिवाळीच्या दिवशी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने पिंपळोद गावावर शोककळा पसरली.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार 2 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेदरम्यान नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावा पासून एक किमी अंतरावर एक मोटरसायकल नादुरुस्त झाली होती. अंधार असल्याने दुचाकी स्वाराच्या मदतीसाठी अजून दोन दुचाकी त्या ठिकाणी थांबल्या होत्या. त्यावेळी नंदुरबार कडून धानोरा कडे भरधाव वेगात जाणारी बोलेरो ( जी.जे.02, झेड.झेड.0877 ) यावरील चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या उभ्या असलेल्या मोटरसायकलसह नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात योगेश कालूसिंग नाईक (40) रा.पिंपळोद, ता.नंदुरबार, राहुल धर्मेंद्र वळवी (26) रा.पिंपळोद, ता.नंदुरबार, अनिल सोन्या मोरे ( 24) रा.शिंदे,ता.नंदुरबार, चेतन सुनील नाईक (12 ) रा.भवाली, ता.नंदुरबार, श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे (40 ) रा.पिंपळोद, ता.नंदुरबार यांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर तिघांच्या मोटरसायकलचा चक्काचुर झाला. तर बोलेरो गाडीही उलटली होती. गावकऱ्यांच्या मदतीने तिला सरळ करण्यात आली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. एन दिवाळीत एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघाच्या ठिकाणी पोलीस दल दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Nandurbarnandurbar accidentnandurbar marathi newsनंदुरबारनंदुरबार मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment