Sada Sarvankar Condition To Raj Thackeray: माहीम मतदारसंघातील पेच सुटायच्या जागी आणखी वाढत चालला आहे. आता सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राज ठाकरेंसमोर एक मोठी अट ठेवली आहे.
लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेत भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण, शिंदेंनी सरवणकरांच्या उमेदावारीची घोषणा केल्यानंतर अमित ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामुळे शिंदेंची अडचण झाली. त्यानंतर भाजपकडून दबाव वाढल्यानंतर शिंदेंनी सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने शिंदेंची चिंता वाढली. तसेच, अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यापूर्वी राज ठाकरेंनी चर्चा केली असती, तर वेगळा निर्णय घेतला असता, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
जेव्हापासून उमेदवारीची घोषणा झाली, तेव्हापासून सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेणार का, असा प्रश्न सतत विचारला जात होता. मात्र, निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं सरवणक यांनी स्पष्ट केलं. मात्र, आता सरवणकरांनी राज ठाकरेंसमोरच एक अट टाकली आहे. सरवरणकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची इच्छा आहे. पण, मनसेने महायुतीविरोधात सर्वच मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. जर, मनसेने आपले उमेदवार मागे घेतले तर मी पण पक्षासाठी निवडणुकीतून माघार घेण्यास तयार आहे, मी पक्षासाठी त्याग करायला तयार आहे.
Sada Sarvankar: मी उमेदवारी अर्ज मागे घेईल, जर… सदा सरवणकरांनी पेच वाढवला, राज ठाकरेंसमोर ठेवली मोठी अट
सरवणकरांच्या या अटीमुळे आता महायुतीतील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, मनसे आपले उमेदवार मागे घेतील हे अशक्य आहे. एकट्या माहीमसाठी मसे राज्यातील सर्व मतदारसंघ सोडेल असं वाटत नाही. त्यामुळे यावर आता फडणवीस आणि शिंदे काही तोडगा काढू शकतील की नाही हे पाहावं लागणार आहे.