महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Nov 2024, 1:12 pm
Sanjay Raut on Ajit Pawar: निवडणुकीत काळात कोण काय म्हणतय आणि कोण काय आरोप करतय हे गांभीर्याने घ्यायचं नसते. काही जागा या मित्र पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या.
हायलाइट्स:
- अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंका
- बारामती आता सोपी राहिलेली नाही
- संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही, महाराष्ट्रामध्ये सात ते आठ ठिकाणी असं घडणार आहे. आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ आहे त्यातून आम्ही मार्ग काढू, काही ठिकाणी दोन एबी फॉर्म गेले आहेत, काही ठिकाणी गैरसमजातून घडलं आहे आणि काही ठिकाणी का घडलं याचा आम्ही शोध घेत आहोत? तिन्ही पक्षाचे नेते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत, सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील. सोलापूर दक्षिण मध्ये काँग्रेस पक्षाने अधिकृत एबी फॉर्म कोणालाही दिलेला नाही तिथे शिवसेनेचे अमर पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पुढच्या आठवड्यात होत आहे. सांगोल्याची जागा शिवसेनेची विद्यमान जागा आहे, सांगोल्या मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहील. शेतकरी कामगार पक्षांबरोबर काल सुद्धा आमची चर्चा झाली त्यामध्ये अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते, सांगोल्यावर चर्चा होणार नाही.