Ajit Pawar At Baramati: लोकसभेत तुम्ही शरद पवारांना खुश केलं आता साहेब आले तर त्यांना सांगा, लोकसभेत तुम्हाला खुश केलं आता दादा काम करतात त्यांना खुश करु, असं वक्तव्य अजित पवारांनी म्हटलं.
अजित पवार म्हणाले की, गावकऱ्यांनो मला माहिती आहे. तुमच्या मनात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही बोलत नव्हता. परंतु तुमच्यात अंडर करंट होता. तेव्हा काही जण म्हणायचे की, साहेबांच आता एवढं वय झालंय. या वयात जर सुप्रियाताई पडल्या, तर साहेबांना कसं वाटेल? मग लोकसभेला आपण ताईंना मतदान करू, असे म्हणत अजित पवार म्हणाले की, लोकसभेला जे केलं ते ठीक आहे. ते मी स्वीकारलं. लोकसभेला ताईंना मतदान करून तुम्ही साहेबांना खुश केलं. बारामतीकरांवर माझाही तेवढाच अधिकार आहे. आता विधानसभेला खालची निवडणूक आहे. तर या निवडणुकीत दादाला खुश करा असं म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
आता ‘दादा’ काम करतात, आता त्यांना खुश करू..!
“साहेब जरी आले तरी तुम्ही साहेबांना सांगा, लोकसभेला तुमचं काम केलं..! तुम्हाला खुश केलं.. आता ‘दादा’ काम करतात. आता त्यांना खुश करू आणि बारामती तालुक्याचा विकास आप आपल्या परीने करू”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
Ajit Pawar: साहेबांना सांगा लोकसभेत तुम्हाला खुश केलं, आता दादांना करु; अजित पवारांच्या विधानाची चर्चा
गाठीभेटीवर भर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात हाय होल्टेज समजल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सखे पुतणे युगेंद्र पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पाठिंब्याने उभे ठाकले आहेत. तर दोन्ही बाजूने प्रचाराला सुरुवात झाली असून, त्यांच्याकडून गावोगावी, वाड्यावस्त्यांवर जात नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार केला जात आहे.