भाजपवाले आपल्याकडे नकोत! बारामतीत अजितदादांनी ३ कार्यकर्त्यांचा प्रवेश रोखला; एकच हशा पिकला

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज दिवसभरात ते २७ गावांना भेटी देणार आहेत. सकाळपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढत आहेत. बारामतीत लोकसभेला अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभेसाठी अजित पवार सावध होऊन कामाला लागले आहेत. आज ते बारामतीत गावभेटी घेत आहेत. दिवसभरात ते २७ गावांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी एका गावात एक लक्षवेधी प्रसंग घडला.

अजित पवार साबळेवाडी गावात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना अनेकांना पक्षात येण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यानंतर अजित पवारांनी पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांची माहिती घेतली. तेव्हा त्यातील ३ जण भाजपचे कार्यकर्ते असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अजित पवारांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. यांचे पक्षप्रवेश करु नका, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांनी छोटेखानी सभेत दिल्या.
Manoj Jarange Patil: कुठे लढायचं, कुठे पाडायचं, कुठे पाठिंबा द्यायचा? जरांगेंचं ठरलं, मतदारसंघांची यादी समोर
‘शहाण्यांनो, यांचा पक्षप्रवेश करु नका, हे भाजपमधले आहेत. दुसरे कुठले असते तर चालले असते. भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करता येणार नाही. त्यांना आपल्याकडे घेतलं तर भाजपवाले म्हणतील आमचे लोक घ्यायला लागला काय? भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या लोकांना घेता येणार नाही. बाकीचे लोक घेता येतील, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राज ठाकरेंची दोन विधानं शिंदेंना खटकली; माहीममधून माघार न घेण्यावर ठाम, आता थेट आर या पार
अजित पवारांचा बारामती दौरा
अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उपमुख्यमंत्री आज गावांना भेटी देत आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. अनेक ग्रामस्थ उठण्यापूर्वीच आज अजित पवार त्यांच्या गावात पोहोचले. रात्री आठ ते साडे आठपर्यंत अजित पवार गावभेटी देतील.

Ajit Pawar: भाजपवाले आपल्याकडे नकोत! बारामतीत अजितदादांनी ३ कार्यकर्त्यांचा प्रवेश रोखला; एकच हशा पिकला

लोकसभेला नणंद विरुद्ध भावजय, विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या
लोकसभेला बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष झाला. त्यात सुळेंनी बाजी मारली. अजित पवारांच्या पत्नीचा लोकसभेत पराभव झाल्यानं, त्यातही तो बारामतीत झाल्यानं त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला गेला. आता विधानसभेला अजित पवारांसमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे. पवार कुटुंबातील सर्वाधिक शिक्षण झालेले सदस्य अशी त्यांची ओळख आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Maharashtra Political NewsMaharashtra politicsSupriya SuleYugendra Pawarअजित पवारभाजपमहाराष्ट्र राजकीय बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Comments (0)
Add Comment