Jalgaon Crime News: चार चाकी वाहनाने दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद पेटला आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर तरुणाची निर्दयीपणे हत्या देखील करण्यात आली आहे.
जळगावमधील जळोद-अमळगाव शिवारात ही धक्कादायत घटना घड़ली आहे. कारमध्ये असलेल्या तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर दोन्ही गटात वाद पेटला. या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा हत्या करण्यात आली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
विकास प्रवीण पाटील हा मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मोटरसायकलला भरधाव येणाऱ्या स्विफ्टकारने कट मारला. यात दुचाकीचे इंडिकेटर तूटले त्यावरून दोन्ही गटात वाद झाला आणि भररस्त्यात हाणामारी सुरु झाली. त्यानंतर काही जणांनी लोखंडी रॉड, दांडक्यांनी विकासच्या अंगावर धाव घेतली हे पाहून त्याने पळ काढला. मात्र संशयित आरोपींनी त्याला गाठून त्याचा खून केला.
विकासचा मृतदेह याचा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला, कुटुंबीयांना समजताच त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहेत. मात्र त्यांची धरपकड सुरु असून पोलिसांनी जामनेर तालुक्यातून तिघांना ताब्यात घेतले आहे. यातील एकजण जणशेंदुर्णी परिसरात शिक्षक असल्याचे माहिती समोर आली आहे.
संशयित आरोपी अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, रोहित सीताराम पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव यांना जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. आणखी संशयित आरोपी वाढण्याची शक्यता आहे.