Belapur Assembly Constituency: बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक यांच्यात लढत होणार आहे. आपल्या नावाचे अपक्ष उमेदवार उभे करणाऱ्या विरोधकांवर मंदा म्हात्रे यांनी जोरदार हल्ला चढवला.
संदीप नाईकांना भाजपकडून उमेदवार हवी होती. मात्र पक्षाने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी कायम ठेवली. यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार आहे. दरम्यान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
विरोधकांना माझ्या नावाची भीती वाटते. म्हणूनच ते माझ्या नावाचे अपक्ष उमेदवार उभे करत आहेत, असे म्हणत मंदा म्हात्रे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांच्यावर हल्लाबोल केला. इतक्या खालच्या थराला जाऊन निवडणूक लढवली पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकांशी संपर्क असेल, लोकांसाठी कामे केली असतील तर लोकच मतदान करतील. बोलणाऱ्याची माती विकली जाते. न बोलणाऱ्याचे सोने देखील विकले जात नाही. निडणुकीत मी लोकांशी संपर्क साधत होती आणि त्यामुळेच मी निवडणू देखील आले. आता सुद्ध मला लोकांवर विश्वास असल्याचे मंदा म्हात्रे म्हणाल्या.
बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांनी २०१४ आणि २०१९ अशी सलग दोन वेळा बाजी मारली आहे. यात एका निवडणुकीत त्यांनी संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांचा पराभव केला होता. नाईक पिता-पुत्रांनी यावेळी बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला होता. यापैकी पक्षाने गणेश नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी दिली. मात्र संदीप नाईकांना बेलापूरमधून उमेदवार मिळू शकली नाही. त्यामुळे भाजपचा यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता या निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे बाजी मारतात की ऐन निवडणुकीच्या आधी पवारांसोबत आलेले संदीप नाईक बाजी मारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.