Manoj Jarange Patil : धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कळंब, परांडा भूम या मतदारसंघांमध्ये आता मराठा समाजाचे उमेदवार असणार असून त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वेगळीच रणनिती आखल्याचे समोर येत आहे.
धाराशिव कळंब, परंडा भूम या मतदार संघामध्ये मराठा समाजातील उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाची वाट पहात उमेदवार होते. मनोज जरांगे पाटील हे काय निर्णय घेतात याकडे इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागून राहिले होते तसेच मराठा समाज देखील मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला होता.
जरांगे यांनी डाव टाकला; धाराशिव, परंडा येथील राजकीय समीकरणे बदलणार
धाराशिव कळंब, परांडा भूम या दोन्ही मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलताना दिसतील, धाराशिव कळंब या मतदारसंघातून शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गट यांचे विद्यमान आमदार कैलास पाटील, शिवसेना पक्ष शिंदे गटाचे अजित पिंगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवदत्त मोरे यांना मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार हे किती घातक ठरतात हे पुढील काही दिवसात दिसून येणार आहे. तसेच परंडा भूम या मतदारसंघांमध्ये शिवसेना पक्ष शिंदे गट यांचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांची उमेदवार राहुल मोटे, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाचे रणजीत पाटील यांना देखील मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार कित पर्यंत घातक ठरतात हे पुढील काही दिवसांमध्ये दिसून येईल. त्यामुळे यापुढील काही दिवस फार महत्वाचे ठरणार आहेत. या दिवसांत कोणती समीकरणं बदलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.