Bhool bhulaiyaa 3 vs singham Again collection: बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.सिंघम अगेन आणि भुल भुलैया ३ या दोन्ही सिनेमांची मोठी कमाई झाल्याचं दिसत आहे.
हायलाइट्स:
- बॉक्स ऑफिसवर दोन मोठे सिनेमे
- प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला गर्दी
- कमाई किती?
तर दुसऱ्या दिवशी सिंघम अगेन सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून आलं, तर भुल भुलैया ३ सिनेमाच्या कमाईत वाढ झाली.भुल भुलैया ३ सिनेमानं शनिवारी ३७ कोटींच्या जवळपास कमाई केली तर सिंघम अगेन चित्रपटाची कमाई ४२ कोटींच्या जवळपास होती. तर तिसऱ्या दिवशी रविवारी सिनेमानं ३५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं सिंघम अगेन सिनेमाचं फर्स्ट वीकेंड कलेक्शन हे १२१ कोटींच्या जवळपास झालं आहे. तर भुल भुलैया ३ चं कलेक्शन हे १०६ कोटींच्या घरात आहे.
बॉक्स ऑफिसवर सापशिडीचा खेळ, कोण पुढे -कोण मागे?सिंघम अगेन आणि भुल भुलैया ३ ने तीन दिवसांत कमावले तब्बल…
सिंघम अगेनचं वर्ल्डवाइड कलेक्शन कलेक्शन किती?
तर सिंघम अगेनचं वर्ल्डवाइड कलेक्शन हे १६५ कोटींच्या घरात झालं आहे. तर भुल भुलैया ३ चं कलेक्शन हे सिंघम अगेनच्या तुलनेत कमी झालं आहे. तब्बल ४०० कोटींच्या बजेट मध्ये तयार झालेला सिंघम अगेन आगामी काळातही चांगली कमाई करू शकतो, असं म्हटलं जात आहे. तर भुल भुलैया ३ ला देखील प्रेक्षकांचा आणखी प्रतिसाद मिळू शकतो.
दरम्यान, दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या धाटणीचे असले तरी प्रेक्षकांनीही एका सिनेमाची निवड न करता दोन्ही सिनेमे पाहायला प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे.