Maharashtra Assembly Election Date Announcement: राज्यात निवडणुका जाहीर, २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल

Maharashtra Assembly Election 2024 Date & Schedule: राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत मतदान आणि मतमोजणीची तारीख घोषित केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर २०२४ ला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखांची घोषणा केली.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा

निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू

महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली.

निवडणूक आयोगाला २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान पर पडेल. तर २३ नोव्हेंबरला मराहाष्ट्रातील जनता महायुतीला निवडते की महाविकास आघाडीला याचा निकाल लागेल.
Mahayuti: महायुतीकडून ठरलेली पत्रकार परिषद अचानक रद्द, नेमकं काय घडलं? मोठं कारण समोर

महाराष्ट्रात किती मतदार?

  • महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार
  • महिला मतदार – ४.६६ कोटी
  • पुरुष मतदार – ४.९७ कोटी
  • युवा मतदार – १.८५ कोटी
  • नव मतदार – २०.९३ लाख

राज्यातील मतदान केंद्रांची माहिती

  • महाराष्ट्रात १ लाख १८३ मतदान केंद्र
  • शहरी मतदान केंद्र – ४२, ६०४
  • ग्रामीण मतदान केंद्र – ५७,५८२
  • महिला अधिकाऱ्यांची मतदान केंद्र – ३८८
  • नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्र – २९९

प्रचार तोफा कधी थंडावणार?

निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावतील.

झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार

झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर

शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे, सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणूक निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. ठाकरेंची साथ सोडून शिंदेंनी शिवसेना मिळवली, तर अजित पवारांनी राष्ट्रवादी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना जनता किती साथ देते पाहावं लागेल. तर, दुसरीकडे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जादू लोकसभेप्रमाणे पुन्हा कमाल करणार का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Maharashtra Assembly Election Date Announcement: राज्यात निवडणुका जाहीर, २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल

सध्या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरुन मोठी रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच पक्ष श्रेष्ठींकडे इच्छुकांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी नेत्यांचं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात असं सुरु आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

election commission press conferencemaharashtra assembly election date announcementmaharashtra vidhan sabha election announcementvidhan sabha election date scheduleVidhan Sabha Nivadnukकेंद्रीय निवडणूक आयोगमहाराष्ट्र विधानसभा आचारसंहितामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकमहाविकास आघाडी जागावाटप फॉर्म्युलाविधानसभा निवडणूक घोषणा
Comments (0)
Add Comment