Borivali Vidhan Sabha : विधानसभेला तिकीट मिळण्याच्या आशेवर असलेल्या गोपाळ शेट्टींना भाजपच्या तिसऱ्या यादीत धक्का बसला
Gopal Shetty : भल्याभल्यांना जमलं नाही, ते तावडेंनी करुन दाखवलं, तिढा सुटला, मुंबईचं लक्ष लागलेली लढत आता दुहेरीच
गोपाळ शेट्टी याआधी दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळीच सागर बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे असलेले विनोद तावडेही गोपाळ शेट्टी यांच्यासोबत आले होते. आधी विनोद तावडेंना आणलं, मग सुनील राणेंना, असा उल्लेख गोपाळ शेट्टींनी पूर्वी केला होता.
Shiv Sena Star Campaigner : कदम-कीर्तिकर ते शरद पोंक्षे-गोविंदा; शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची फौज जाहीर
गोपाळ शेट्टींनी बंडखोरी का केली होती?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पियुष गोयल यांच्यासाठी पत्ता कट झालेल्या गोपाळ शेट्टी यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द त्यावेळीही देण्यात आला होता. परंतु विधानसभेला तिकीट मिळण्याच्या आशेवर असलेल्या शेट्टींना भाजपच्या तिसऱ्या यादीत धक्का बसला, जेव्हा विद्यमान आमदार सुनील राणेंचं बोरीवलीतून तिकीट कापलं गेलंच, पण मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठरवलं.
गोपाळ शेट्टी काय म्हणाले होते?
बोरीवली ही काही धर्मशाळा नाही, कायद्याने कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकत असलं, तरी काही स्थानिक मुद्दे असतात. आधी विनोद तावडे यांना आणलं, मग सुनील राणेंना आणळं, माझी सीट पियूष गोयल यांना दिली, तरीही मी गप्प बसलो. संजय उपाध्याय चांगले कार्यकर्ते आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही, परंतु बोरिवलीत वारंवार खेळ करणं योग्य नाही, असं गोपाळ शेट्टी म्हणाले होते. मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं नव्हतं, त्यामुळे बंडखोरी म्हणणं चुकीचं आहे. परंतु मी भाजपच्या ध्येय धोरणांना हरताळ फासत नाही, असं गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं होतं.