सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं

Rashmi Shukla Trasnfer :विधानसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवलं गेलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं

मुंबई : विधानसभा निवडणुक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी नेत्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम होईपर्यंत रश्मी शुक्ला यांच्याकडे पदभार असू नये, पोलीस महासंचालकपदी दुसऱ्या कोणीच निवड करण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे लावून धरली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवले असून त्यांच्या जागी तीन अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. निवडणूक तटस्थ होण्यासाठी निवडणूक आयोग आदेश देते की, कोणतेही अधिकारी तीन वर्षे एखाद्या पदावर राहिले असतील तर त्यांच्या बदल्या केल्या जाव्यात. याच पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांची बदली केली जावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा आणि संजीव कुमार सिंघल डी.जी. पी (अँटी करप्शन ब्युरो) या तीन नावांची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची निवड होण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

marathi newsrashmi shuklaRashmi Shukla Marathi Newsपोलीस महासंचालक रश्मी शुक्लारश्मी शुक्ला मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment