‘टायगर अभी जिंदा है’ डरकाळी फोडणारेच निवडणूक रिंगणातून बाहेर, काँग्रेसच्या उमेदवारावर अशी वेळ का आली?

Solapur South Vidhan Sabha: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी कशी मिळत नाही, मी बघतोच, टायगर अभी जिंदा है! अशी डरकाळी फोडलेले काँग्रेस नेते दिलीप माने यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Lipi

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी कशी मिळत नाही, मी बघतोच, टायगर अभी जिंदा है! अशी डरकाळी फोडलेले काँग्रेस नेते दिलीप माने यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या यादीत नाव जाहीर झाले आणि उमेदवारी अर्ज भरणा्च्या शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म आले नव्हते. शेवटी काँग्रेस नेते दिलीप माने यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला लागला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिलीप माने खासदार प्रणिती शिंदेंसोबत आले आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

टायगर अभी जिंदा है अशी डरकाळी फोडणाऱ्या दिलीप मानेंना काँग्रेसकडून उमेदवारी तर देण्यात आली. पण त्यांना नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणांपर्यंत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म काही मिळालाच नाही. अखेर वेळ निघून जाईल यामुळे मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आज त्यांना तो अपक्ष उमेदवारी अर्ज देखील मागे घ्यावा लागला आहे. दरम्यान, अपक्ष माघारी घेऊन दिलीप माने मात्र माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता निघून गेले. मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज भरणाऱ्या दिलीप मानेंचा काँग्रेसने गेम केला का? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे.
अधिकृत उमेदवाराची माघारी,काँग्रेसवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ; कोल्हापूर उत्तरमधील घडामोडींवर नाना पटोलेंची मोठी प्रतिक्रिया
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात विरोधकांना घाम फोडणारे काँग्रेस नेते दिलीप माने निवडणूकीच्या रिंगणातुन बाहेर पडले आहेत. दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या सुभाष देशमुख यांच्यासमोर उभे राहिलेले तगडे आव्हान संपुष्टात आले आहे. महाविकास आघाडीतर्फे नवखे उमेदवार उबाठा शिवसेनेचे अमर पाटील हे मुख्य उमेदवार आहेत. तसेच श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धर्मराज काडादी हे देखील अपक्ष उमेदवार आहेत. स्वतःला टायगर ही उपाधी लावलेल्या दिलीप मानेंवर मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची नामुष्की ओढवली आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Dilip Manemh vidhan sabha nivandukshivsena ubt in Solapur sithsolapur congress candidatesolapur south vidhan sabhaदिलीप मानेंची माघारमहाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळीशिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटीलसोलापूर दक्षिण काँग्रेस उमेदवारसोलापूर दक्षिणमधील राजकीय गणित
Comments (0)
Add Comment