जरांगे पाटलांची अचानक माघार; गेल्या दोन दिवसांत पडद्यामागे काय घडलं? घटनाक्रम समोर

Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज माघार घेतली. त्यांनी याबद्दलची ही घोषणा आज केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जालना: लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका मराठा समाज विधानसभा निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. कुठे उभं राहायचं, कुठे पाडायचं आणि कुठे पाठिंबा द्यायचा, याचाही निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याचं बोललं गेलं. मतदारसंघांच्या याद्याही पुढे आल्या. पण पाटलांनी आज अचानक माघार घेतली. उमेदवार न देण्याची घोषणाच त्यांनी करुन टाकली. एका रात्रीत असं काय घडलं की जरांगेंनी माघार घेतली अशी चर्चा सुरु झाली.

एकट्या मराठा मतांच्या जोरावर उमेदवार विजयी होऊ शकणार नाहीत याची कल्पना आल्यानं जरांगेंनी मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नुमानी, राजरत्न आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. मराठा, मुस्लिम आणि दलितांची मोट बांधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु झाली. तिन्ही समाजाचे मिळून २५ उमेदवार दिले जातील, त्यात मराठा समाजाचे १० ते १५ उमेदवार असतील, अशी चर्चा होती. काल ही चर्चा सुरु असताना आज जरागेंनी एकाएकी माघार घेतली.
Maharashtra Election: भाजपनं समजावलं, विमान पाठवलं; तरीही फडणवीस समर्थकाची बंडखोरी कायम, विखेंचं टेन्शन वाढलं
जरांगे पाटील यांच्या माघारीमागे २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून घडलेल्या घडामोडी आहेत. त्या रात्री काही मुस्लिम उमेदवारांनी आपण मराठा उमेदवारांना पाठिंबा देणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर जरांगे त्या बैठकीतून रागानं उठून गेले. पण त्यानंतर समेट घडून आवा. आधी जरांगे मराठा उमेदवारांची यादी जाहीर करतील. मग मुस्लिम, दलित समाजातून यादी देण्यात येईल. ती फायनल होऊन जाहीर करण्यात येईल असं ठरलं.

यानंतर काल दिवसभर अंतरवाली सराटीत बैठका, चर्चा सुरु होत्या. पण काल दिवसभर आंबेडकरांचा जरांगेंशी संपर्क नव्हता. काल रात्री ते उशिरा जरांगेंना भेटायला पोहोचले. पण यादीची चर्चा पुढे सरकलीच नाही. पहाटे तीनपर्यंत जरांगे दलित, मुस्लिमांच्या यादीची वाट पाहत राहिले. पण ती त्यांना मिळालीच नाही. त्यामुळे जरांगेंची अडचण झाली.
बंडखोर ठाम, म्हणून अधिकृत उमेदवाराचीच माघार; मविआला कोल्हापुरात मोठा धक्का
मराठा समाजातील अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जरांगेंच्या आदेशानंतर एकाचा अर्ज कायम ठेवून बाकीच्यांनी अर्ज मागे घ्यायचं असं ठरलं होतं. पण नेमका कोणाचा अर्ज ठेवायचा हे ठरवणं अवघड झालं. अर्ज मागे घेण्याची अनेकांची मानसिकता नव्हती. त्यामुळे इथेही अडचण झाली. प्रस्थापित नेत्यांसमोर आपला निभाव लागेल का, असा प्रश्नही काहींनी बैठकीत उपस्थित केला. जरांगेंना ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती त्यांनी ऐनवेळी घात केल्याची भावना यामुळे मराठ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांची अचानक माघार; गेल्या दोन दिवसांत पडद्यामागे काय घडलं? घटनाक्रम समोर

दलित, मुस्लिमांची मदत न मिळाल्यास मराठा उमेदवारांचा पराभव होणार याची खात्री असल्यानं जरांगेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मराठा उमेदवार पराभूत झाले असते तर यातून आंदोलनाची राजकीय ताकद नसल्याचा मेसेज गेला असता. हा प्रकार टाळण्यासाठी जरांगेंनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याची घोषणा करताना जरांगेंनी मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी दिली नाही. मराठा समाज एकटा लढला तर निवडून येणार नाही, असं म्हटलं. त्यामुळे जरांगेंचा घात त्यांच्याच मित्रांनी केला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Maharashtra politicsmanoj jarange patilMaratha Reservationrajratna ambedkarमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षणमहाराष्ट्र राजकीय बातम्याराजरत्न आंबेडकरविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment