Baramati Vidhan Sabha: बारामती विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नऊ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता निवडणूक रिंगणात २३ उमेदवार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
बारामती विधानसभेत एकूण ३२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी गणेश मारुती खामगळ, पंकज बापूराव भिसे, धनंजय पोपट गडदरे, राहूल बाळासो थोरात, दत्तात्रय बबन जराड, दादा एकनाथ थोरात, त्रिशला मिलिंद कांबळे, सुरेंद्र शामसुंदर जेवरे, पंढरीनाथ बाळासो रसाळ या नऊ जणांनी ४ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेतले आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे महायुती व महाविकास आघाडीत कोणतीही बंडखोरी झालेली नाही. दरम्यान प्रतिष्ठेच्या या लढाईत कोणते पवार वरचढ ठरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
बारामतीतील एकूण उमेदवारांची यादी
१) अजित अनंत पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२)चंद्रकांत दादू खरात – बहुजन समाज पार्टी
३) युगेंद्र श्रीनिवास पवार – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
४) अनुराग आदिनाथ खलाटे – भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
५) संदीप मारुती चोपडे – राष्ट्रीय समाज पक्ष
६) मंगलदास तुकाराम निकाळजे – वंचित बहुजन आघाडी
७) विनोद शिवाजीराव जगताप – संभाजी ब्रिगेड पार्टी
८) सोहेल शहा युनूस शहा शेख – समता पार्टी
९) अब्दुलरोफ उर्फ रज्जाक जाफर मुलाणी – अपक्ष
१०) अभिजीत महादेव कांबळे – अपक्ष
११) अभिजीत वामन आवाडे-बिचुकले – अपक्ष
१२) अमोल नारायण चौधर – अपक्ष
१३) अमोल युवराज आगवणे – अपक्ष
१४) कल्याणी सुजितकुमार वाघमोडे – अपक्ष
१५) कौशल्या संजय भंडलकर – अपक्ष
१६) सीमा अतुल चोपडे – अपक्ष
१७) मिथून सोपानराव आटोळे – अपक्ष
१८) विक्रम भरत कोकरे – अपक्ष
१९) शिवाजी जयसिंग कोकरे – अपक्ष
२०) सचिन शंकर आगवणे – अपक्ष
२१) सविता जगन्नाथ शिंदे – अपक्ष
२२) संतोष पोपटराव कांबळे – अपक्ष
२३) संभाजी पांडूरंग होळकर – अपक्ष