Raj Thackeray: माहीममधील राजकारण आठवडाभर चर्चेत राहिलं. इथून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे लढत आहेत. त्यांच्याविरोधात सेनेकडून सदा सरवणकर रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड म्हणून शिंदेसेनेनं माहीममधून माघार घ्यावी आणि अमित ठाकरेंचा मार्ग सुकर करावा, अशी भूमिका भाजप नेत्यांची होती. पण सरवणकर यांनी माघार घेतली. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका महत्त्वाची होती. लोकसभा निवडणुकीत राज यांनी शिंदेंचे पुत्र श्रीकांत यांच्यासाठी सभा घेतली होती. पण आता राज यांचे पुत्र मैदानात असताना शिंदेंनी माघार घेतलेली नाही. याचे परिणाम मुंबईतील अन्य मतदारसंघात दिसू शकतात.
मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. पैकी २५ जागांवर मनसेनं उमेदवार दिले आहेत. माहीममध्ये घेण्यात आलेली पाहता या २५ मतदारसंघांमध्ये राज ठाकरे विशेष जोर लावतील. त्यामुळे भाजप, शिंदेसेनेची चिंता वाढली आहे. मुंबईत भाजप १७ जागा, तर शिंदेसेना १६ जागा लढवत आहे. दोन्ही पक्ष मिळून ३३ जागांवर लढत आहे. पैकी २२ जागांवर त्यांच्यासमोर मनसेचे उमेदवार आहेत. शिंदेसेनेच्या वाट्याला आलेल्या १२, तर भाजपकडे आलेल्या १० जागांवर मनसेचे उमेदवार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची भाजपशी जवळीक वाढलेली आहे. त्यामुळेच त्यांनी कुलाबा, वांद्रे पश्चिम, मुलुंड, मलबार हिलमध्ये उमेदवार दिलेले नाहीत. या मतदारसंघांतून भाजपचे प्रमुख नेते रिंगणात आहेत. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असं भाकित वर्तवणाऱ्या राज यांनी शिंदेसेनेच्या उमेदवारांविरोधात लावलेला आहे.
Raj Thackeray: माहीमचा विषय गाजला; ‘राज’पुत्राची वाट बिकट; प्रतिहल्ल्यात शिंदेसेनेचा किती जागांवर गेम?
स्थानिक पातळीवर भाजपकडून मनसेला मदत पुरवली जात असल्याच्या तक्रारी सेनेच्या १० उमेदवारांनी शिंदेंकडे केल्या आहेत. त्यामुळे भाजप-मनसेच्या छुप्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. शिंदेंनी अखेरपर्यंत माहीमची जागा सोडलेली नाही. तर भाजपचे नेते ही जागा सेनेनं सोडावी यासाठी प्रयत्नशील होते. भाजप, शिंदेसेनेच्या या भूमिका पाहता मनसेचा सर्वाधिक फटका शिंदेसेनेलाच बसण्याची शक्यता अधिक आहे.