नंदुरबारमध्ये महायुतीला धक्का, हिना गावितांनी शड्डू ठोकला अन् राजीनाम्याचा पत्ताही टाकला; वरिष्ठांसमोर नवा पेच

Heena Gavit Candidature Remains: अक्कलकुवा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठांना अपयश आले आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही हिना गावितांनी माघार न घेतल्याने येथे चौरंगी लढत रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Lipi

महेश पाटील, नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठांना अपयश आले आहे. शिंदेसेनेकडून आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांनी बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही हिना गावितांनी माघार न घेतल्याने येथे चौरंगी लढत रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. यातच डॉक्टर हिना गावित यांनी आपण भाजपाला राजीनामा पाठवणार असून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम क्षणी शिंदेंच्या शिवसेनेचे विजय पराडके यांनी माघार घेतली. मात्र गावितांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आमश्या पाडवींसमोर नवा पेच असणार आहे. भाजप पक्षातील शिस्तीचा भाग म्हणून आपण भाजपाचा पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यासंदर्भात प्रतिक्रिया देत हिना गावित म्हणाल्या की, नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार गावित हे आहेत. असे असताना शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते महायुतीमध्ये सक्रिय न राहता उघडपणे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बळ देत आहेत. भाजपाच्या विरोधातील त्यांच्या या भूमिकेविषयी यापूर्वी देखील पक्षाच्या वरिष्ठांना सांगून झाले आहे. आज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रतीक्षा केली. तरीही या परिस्थितीत काहीच बदल घडलेला नाही. शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी गद्दारीची भूमिका सोडलेली नाही. म्हणून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून मी दाखल केलेले माझी उमेदवारी कायम ठेवली आहे.

हिना गावित पुढे म्हणाल्या, अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी तसेच आमचे हक्क अबाधित राखण्यासाठी पुढची लढाई लढणार आहे. माझ्या या भूमिकेला स्थानिक जनतेचा भरभरून पाठिंबा आणि प्रतिसाद आहे. महायुतीमधील व पक्षातील शिस्तीचा भाग म्हणून तसेच राजकीय संकेत पाळून मी भाजपाच्या पदांचा राजीनामा पाठवणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

akkalkuva vidhan sabhaamshya padvibjp candidates in MaharashtraCM Eknath ShindeHeena Gavitअक्कलकुवा मतदारसंघआमश्या पाडवीएकनाथ शिंदेंसमोर नवे आव्हानभाजपचे राज्यातील उमेदवारहीना गावितांची बंडखोरी
Comments (0)
Add Comment