अमित यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा, ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया

Varun Sardesai on Amit Thackeray : अमित ठाकरेंबद्दल थेट विचाराल, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं वरुण सरदेसाई म्हणाले

Varun Sardesai : अमित यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा, ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया

मुंबई : उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत बातचित करताना झिशान सिद्दीकी, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या राजकारणातील युवा चेहऱ्यांविषयी भाष्य केलं. सिद्दीकींबाबत सहानुभूतीचा फटका निवडणुकीत बसणार नाही, असं सांगतानाच वरुण यांनी आदित्य ठाकरेंच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगितलं. तर माहीममधून रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरेंनाही शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ असलेल्या वरुण सरदेसाई यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.

वरुण सरदेसाई काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. ते मुंबईचे पालकमंत्री होते, त्यामुळे ते जास्तीत जास्त सभा होणार आहेत. मुंबईतील सर्व २२ जागांवर ते सभा घेणार आहेत. वरळीत गेल्या पाच वर्षांतील त्यांचं काम पाहता नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.
पक्षाची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे एवढं काम केल्यावर त्यांना वरळीत वेगळ्या प्रचाराची गरज नाही. निवडणूक म्हटल्यावर कोण ना कोण विरोधात उमेदवार देणारच, परंतु त्याचा फार फरक पडणार नाही, असा विश्वास वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.
Raj Thackeray : धनुष्यबाण उद्धव ठाकरे-शिंदेंची प्रॉपर्टी नाही, राज ठाकरेंचा निशाणा; कितीही वैचारिक वाद असले, तरी शरद पवार…

आदित्य ठाकरेंचं कौतुक

आदित्य ठाकरे यांचा राजकीय प्रवास मी जवळून पाहिला आहे. मंत्री झाल्यावर त्यांना वेगळं एक्स्पोझर मिळालं. प्रशासकीय यंत्रणा कशा काम करतात, हे शिकायची त्यांना उत्सुकता होती. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध जुळले आणि ते अजूनही कामी येतात. सरकार आणि प्रशासन कसं काम करतं, याची कमी वयात त्यांना जाण आहे. पक्षफुटीनंतर ते प्रचंड आक्रमक झाले. त्यांचे असंख्य दौरे झाले, लोकसभेलाही त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्याचा परिणाम आम्हाला जाणवला. युवा नेते म्हणून त्यांची काही वर्षांपूर्वी ओळख होती, मात्र आता त्यांची गणना महाराष्ट्राचे टॉप नेते म्हणून होत असल्याचं वरुण म्हणाले.
Poonam Mahajan : भाजपने तिकीट कापल्यावर उद्धव दादाचा फोन, रश्मी वहिनीशी मनातलं बोलले, पूनम महाजनांनी सगळंच सांगितलं

अमित ठाकरेंना शुभेच्छा

अमित ठाकरे यांच्याविषयी विचारलं असता, वरुण म्हणाले की कुठलाही युवक निवडणूक लढत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते आज वेगळ्या पक्षातून लढत आहेत. त्यांच्यासमोर आमच्या पक्षाचे महेश सावंत आहेत, ते विजयी व्हावे अशी माझी इच्छा आहे.
त्यांच्या प्रचाराला मला बोलावलं, तर मी तिथेही जाईन, अमित ठाकरेंबद्दल बोलायचं तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Amit ThackerayMaharashtra politicsUddhav ThackerayVarun SardesaiVidhan Sabha Nivadnukअमित ठाकरे विधानसभाआदित्य ठाकरेरश्मी ठाकरेवरुण सरदेसाई महाराष्ट्र टाइम्स मुलाखतसदा सरवणकर
Comments (0)
Add Comment