नाशिक जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न; काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा बंडखोरांशी चर्चा

Nashik Vidhan Sabha: इगतपुरी – त्र्यंबकेश्वरमधून लकी जाधव यांना उमेदवारी दिल्याने गोपाळ लहांगे, अनिता घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेतली.

महाराष्ट्र टाइम्स
congress flag

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून बंडाचे निशाण फडकावणाऱ्या काँग्रेस इच्छुकांची मनधरणी करण्यात अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले आहे. काही मतदारसंघांमध्ये तर थेट अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाच बंडखोरांशी संवाद साधून त्यांची मनधरणी करावी लागली.

विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सोमवारी (दि.४) माघारीचा अखेरचा दिवस आणि त्याआधीचे दोन दिवस नाट्यमय घडामोडींचे ठरले. नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी दिली होती. परंतु येथे काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, गुलजार कोकणी, हानिफ बशीर यांनी बंडखोरी केली. याचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या मतांवर होणार असल्याने पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्निथला यांनी डॉ. पाटील यांसह अन्य बंडखोरांशी चर्चा केली. परंतु ते उमेदवारीवर ठाम राहिले. अखेर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढली.
भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान; विद्या ठाकूर की समीर देसाई, गोरेगावचा गुलाल कोण उधळणार?
सोमवारी (दि. ४) अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदीप हे डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी ठाण मांडून होते. अखेर महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आपण उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय डॉ. पाटील यांनी घेतला. याशिवाय कोकणी आणि बशीर यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. इगतपुरी – त्र्यंबकेश्वरमधून लकी जाधव यांना उमेदवारी दिल्याने गोपाळ लहांगे, अनिता घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेतली.
बंडोबांच्या तलवारी म्यान! नाशिक मध्य, पूर्व, पश्चिममध्ये तिरंगी; तर देवळालीत बहुरंगी लढत
तालुकाध्यक्षांनी वाढवल्या जिल्हाध्यक्षांच्या अडचणी
चांदवड
– देवळा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. येथून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव हे देखील इच्छुक असल्याने त्यांनीही अपक्ष अर्ज भरला होता. सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु, जाधव यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष केदा आहेर यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने कोतवालांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra election 2024Maharashtra vidhan sabha nivadnukmva governmentnational congress party presidentनाशिक बातम्यानाशिक विधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment