Maharashtra Vidhansabha Election 2024 Astrology : महाराष्ट्रात कोणाची सत्ता? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोणाचे नशिब पालटणार? वाचा ज्योतिष्यांची भविष्यवाणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Prediction Astrologer : येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेसाठी सर्वत्र मतदान केले जाईल. उत्तर प्रदेशानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या जागांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे राज्य महाराष्ट्र मानले जाते. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती वर खाली होताना पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसेल. जाणून घेऊया राजकीय पक्षानुसार ग्रहदशामुळे कोणाचे भविष्य कसे असेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Vidhansabha Election 2024 Astrology : महाराष्ट्रात कोणाची सत्ता? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोणाचे नशिब पालटणार? वाचा ज्योतिष्यांची भविष्यवाणी

Astrological Predicition Maharashtra 2024 :
लोकसभेनंतर महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेसाठी सर्वत्र मतदान केले जाईल. उत्तर प्रदेशानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या जागांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे राज्य महाराष्ट्र मानले जाते.
अशातच सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वातावरण खूप गोंधळात टाकणारं आहे. कोणत्याच राजकीय पक्षात आपण निवडणूक जिंकू असा आत्मविश्वास पाहायला मिळत नाही. जनता कोणत्या पक्षाला मत करेल याविषयी देखील अंदाज बाळगता येत नाहीये.
ज्योतिषशास्त्र श्री.रामेश्वर लांजुळकर यांच्या मते निवडणुकीनंतर मोठे बदल पाहायला मिळतील. ग्रहांच्या बदलत्या दिशांमुळे एकहाती सत्ता पाहणं कठीण असेल. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती वर खाली होताना पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसेल. जाणून घेऊया राजकीय पक्षानुसार ग्रहदशामुळे कोणाचे भविष्य कसे असेल

देवेंद्र फडणवीसांचे ग्रहयोग

भाजप पक्षाचा मुख्य चेहरा असलेले श्री देवेंद्र फडणवीस यांची लग्न कुंडली कन्या राशीची असून त्यात केतू महादशेत शनिची अंतर्दशा आणि गुरुचे परिवर्तन सुरु आहे. गुरु आणि शनि द्वितीय अष्टम भावात असल्यामुळे समसप्तक योग तयार होत आहे. दोघांचीही दशमस्थानावर दृष्टी पाहायला मिळत आहे. अष्टम स्थानातील नीच राशीचा शनि चाांगला परिणाम देण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर फडणवीसांना चांगले पद मिळू शकते.

उद्धव ठाकरेंचे ग्रहयोग

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा प्रमुख चेहरा असलेले उद्धव ठाकरे यांची लग्न कुंडली कन्या राशीची असून गुरुच्या महादशेत चंद्राची अतंर्दशा आणि शनिचे प्रत्यंतर सुरु आहे. धनु राशीतील शनी दोन शुभ ग्रहांच्या प्रभावात आहे. तसेच त्यांची दशम स्थानवार दृष्टी आहे. शनी पंचमेश असून गुरू सोबत युती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा राजयोग मानला जातो. त्यामुळे निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मोठे पद मिळू शकते.

शरद पवारांचे ग्रहयोग

विपक्ष पार्टीतील प्रमुख चेहरा असलेले श्री शरद पवार यांच्या वृश्चिक लग्नाच्या जन्मकुंडलीत सध्या बुध महादशेत शुक्राची अंतर्दशा व बुधाचीच प्रत्यंतर दशा सुरु आहे. बुध व शुक्र द्विर्द्वांश स्थितीत आहेत. या ग्रहयोगामुळे मोठ्या घटना घडू शकतात. यामुळे त्यांच्या कामातील हट्टीपणा वाढू शकतो.

अजित पवारांचे ग्रहयोग

सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले श्री अजित पवार यांच्या तुळ लग्नाच्या जन्मकुंडलीत सध्या बुध महादशेत राहुची अंतर्दशा व केतुची प्रत्यंतर दशा चालू आहे. षष्ठ स्थानात मंगळाची दृष्टी असलेला केतु क्लेशकारक संघर्ष दाखवत आहे. पण केतुचा राशीत लग्नी व चंद्रापासुन नवमस्थानी असल्यामुळे निवडणुकीनंतर श्री अजित पवारांना किंग मेकरच्या भुमिकेत उभा करु शकतो. निवडणुकीनंतर निश्चितच त्यांचं महत्त्व वाढणार आहे.

एकनाथ शिंदेंचे ग्रहयोग

महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वृषभ लग्नाच्या जन्मकुंडलीत सध्या राहु महादशेत सूर्य अंतर्दशा व गुरुची प्रत्यंतर दशा चालू आहे. हा ग्रहयोग शिंदेंना मजबूत स्थितीत असल्याचं दाखवत आहे.

निष्कर्ष
अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत सहयोगी लोकांशी मतभेद होण्याचे योग दिसुन येत आहेत. त्यामुळे हे दोघे सहयोग्यांच्या सोबत राहतील असे दिसत नाही.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत अपमानाचे विष पचवून सर्वांना आश्चर्यात टाकणारे निर्णय घेण्याचे योग दिसून येत आहेत.
शरद पवारांच्या कुंडलीत सहकाऱ्यांना मंत्री पद मिळवून देण्याची धडपड दिसत आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता असे दिसुन येते की आता आहे ती पक्षयुती निवडणुकीनंतर बदलणार व मुख्यमंत्री पद विभागुन घेण्याच्या निर्णयावर एकमत होऊन एक नवीन आघाडी निर्माण होणार. मुख्यमंत्री बनण्याची पहिल्या पाळीत सर्वात जास्त शक्यता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची आहे. उद्धव ठाकरे मुलाला महत्वपूर्ण पद देण्यासाठी प्रयत्न करतील तर देवेंद्र फडणवीस हे पुनः एकदा उपमुख्यमंत्री पद व नंतर दुसऱ्या पाळीत मुख्यमंत्री बनतील. बाकी ईश्वर सर्वसमर्थ आहे व तोच जाणतो की अंततः काय होणार आहे.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

कोणाला मिळणार मुख्यमंत्री पदाची खुर्ची?महायुती कीमहाराष्ट्र विधानसभा भविष्य काय सांगते?महाविकास आघाडी भविष्यविधानसभेत निकाल कोणाच्या बाजूने?
Comments (0)
Add Comment