Satara Crime News : साताऱ्याधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी कारवाईत कोट्यवधींचे घबाड पकडले असून सर्व रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम कोणाची याचा पोलीस तपास करत आहेत, जाणून घ्या.
पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यामधील शेंद्रे येथे पोलिसांनी १ कोटी रूपयांची रोकड पकडली आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई केलीय. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी क्रेटा गाडीची तपासणी केली आणि १ कोटी रूपयांचे घबाड सापडले. ही रक्कम कोणाची आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. रक्कम नेमकी कोणाची आहे याचा तपास पोलीस करत आहेत. निवडणुका जवळ येत असताना आता रक्कम सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पोलिसांनी कडक नाकेबंदी करायला सुरूवात केली आहे. निवडणुकीमध्ये पैशांचा वापर होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आपले सर्व प्रयत्न करते. पोलिसांनी टोलनाके, चेकपोस्टवर चोख बंदोबस्त करत गाड्यांची तपासणीक करत आहेत. या तपासणीदरम्यान मोठी रक्कम पोलीस जप्त करत आहेत.
विरोधकांनी राज्य सरकावर आरोप करताना गंभीर आरोप केले होते. पोलिसांच्या गाड्यांमधून सत्ताधारी उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर ठाकरे गटाचे नेते संज राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना त्यांच्या हेलिकॉप्टमध्ये पैशांच्या बॅगा असल्याचं म्हणत सीआरपीएफचे जवान त्या बॅगा खाली करत असल्याचं म्हटलं होतं. आता गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवापूर येथील टोल नाक्यावर पाच कोटी रूपये पोलिसांनी जप्त केले होते. त्यावेळी ते पैसे सत्ताधारी पक्षामधील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचं आरोप विरोधकांनी केला होता.
दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीला उमेदवारी अर्ज घेण्याची तारीख संपली आहे. जवळपास सर्व जागांवरील चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूकीदरम्यान कोणताही अपप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही आपला बंदोबस्त वाढवला आहे.