Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांनी अजित पवारांना चांगलंच सुनावलं आहे. ३५ वर्ष त्यांना संधी दिली आता नवीन नेतृत्त्वाला संधी द्या असं ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले, आता युगेंद्र देखील उच्चशिक्षित आहे. त्याला तुमच्या प्रश्नाची जाण आहे. तो तुमची कामे करणार आहे. त्यामुळे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत जो निकाल घेतला तोच निकाल विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहू द्या. मी तुमच्यावर सोपवतो. मी कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही परंतु तुम्ही सातत्याने मला भरभरून देत आला. आताही तीच भावना कायम राहू द्या.
विधानसभेचा हा रथ विजयाकडे न्याल
विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. त्यासाठी उद्या मुंबईमध्ये राहुल गांधी मी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबर पर्यंत मी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेणार आहे. मधल्या काळात मी येऊ शकणार नाही. मात्र तुम्ही प्रत्येक जण विधानसभेचा हा रथ विजयाकडे न्याल अशी मला खात्री असल्याचे शरद पवार म्हणाले.
सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते, शरद पवारांचा अप्रत्यक्ष अजित पवारांना टोला!
विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज दिवसभरात बारामती तालुक्याचा चार मोठ्या गावांचा दौरा करत आहे. या दरम्यान चौधरवस्ती, वंजारवाडी गावातील नागरिकांनी शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि शरद पवारांनी थेट आम्ही तुमच्या गावी येतो असा निरोप दिला. त्यावरून सकाळी साडेआठ वाजता चौधरवस्ती येथे शरद पवारांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी जाहीर सभा देखील घेतली.
या सभेमध्ये शरद पवारांनी चौधरवस्तीला खेटून असलेल्या बारामती एमआयडीसीचा उल्लेख केला. या एमआयडीसीमध्ये किती कामगार काम करतात याची माहिती दिली. या एमआयडीसीचा इतिहास सांगताना त्यांनी येथील लोकांना प्रश्न विचारला होता की, तुम्ही जमिनी देणार का? एका क्षणात सगळ्या लोकांनी जमिनी देणार असे सांगितले आणि एमआयडीसी उभी राहिली. असे सांगत शरद पवार १९६७ पासूनचा इतिहास सांगू लागले. या दरम्यान त्यांनी तुम्ही आम्हाला भरभरून दिलं असं म्हणत सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते. असं मला त्यांनी अप्रत्यक्ष अजित पवारांना टोला लगावला.