महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत बकवासगिरी केली; रामदास आठवलेंची कविता म्हणत जोरदार फटकेबाजी

Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज कोल्हापुरातून केला. कोल्हापुरातील सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापूर: आपण सर्व महाविकास आघाडीला गाडण्यासाठी एकत्र आलो आहोत. मविआने लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार करून, मतदारांना ब्लॅकमेल करून, या देशाचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवल्या; दलित, आदिवासी आणि ओबीसींचे आरक्षण जाणार अशी बकवासगिरी करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. ते कोल्हापुरातील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.

कोल्हापूरात महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणूक २०२४च्या प्रचाराचा नारळ फोडला. रामदास आठवले यांनी भाषणाची सुरुवातच कवितेने केली. आमची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू त्यांना महायुतीचे फुले वाहू, महाविकास आघाडीकडे पाहू आणि आपण सर्वजण महायुतीसोबत राहू.

उद्धव ठाकरे तुम्ही तिकडे गेला, पण तुम्ही तिकडे जायला नको होते. पण उद्धव ठाकरे तिकडे केले आणि धनुष्यबाण इकडे आले. शरद पवार तिकडे केले आणि घड्याळ इकडे आले. आणि देवेंद्र फडणवीस इथेच राहिले त्यामुळे कमळ देखील इथेच राहिले, असे रामदास आठवले म्हणाले. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी पाठिंबा द्यायला हवा होता. आपण त्यांना इकडे या असे सांगितले. अजितदादा देखील सांगत होते. तुम्हाला उद्धव ठाकरे चालतात तर मग भाजप का नाही असा सवाल आठवले यांनी यावेळी शरद पवारांना केला.

भाषण कविता आणि आठवले….

महाविकास आघाडी वाले बात करते है बडी बडी; लेकिन चुनकर आयेगा कमळ, धनुष्यबाण और घडी घडी. नरेंद्र मोदीजी की विकास की गाडी गाडी और एकनाथ शिदें और मैंने बढाई ये दाढी दाढी…

या सरकारने काम केले लय भारी, कारण गावा गावात जागी झाली नारी; आता आम्ही करणार आहोत महाराष्ट्राची वारी, पुन्हा एकदा सत्तेत महायुतीची बारी.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

maharashtra election 2024ramdas athawale criticized maha vikas aghadiकोल्हापूर बातम्यामहाविकास आघाडी कोल्हापूर सभारामदास आठवले कोल्हापूररामदास आठवले भाषण
Comments (0)
Add Comment