‘शिवसेना नाव वडील आणि आजोबांनी ठेवलं, याबाबत कोणाचाही आदेश मानणार नाही,’ उद्धव ठाकरेंचा रोख कोणाकडे?

Uddhav Thackeray Campaign Rally in Ratnagiri: कोरोना काळात आपण साडेसहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त करार केले. या गद्दारांनी जर का सरकार पाडलं नसतं तर आज अनेक उद्योग सुरू झाले असते. टाटा एअरबस यांनी गुजरातला नेला आणि प्रदूषणकारी बारसू प्रकल्प येथे जनतेला विचारण्याआधी त्यांच्या माथ्यावर लादला आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला आहे.

Lipi

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोरोना काळात आपण साडेसहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त करार केले. या गद्दारांनी जर का सरकार पाडलं नसतं तर आज अनेक उद्योग सुरू झाले असते. टाटा एअरबस यांनी गुजरातला नेला आणि प्रदूषणकारी बारसू प्रकल्प येथे जनतेला विचारण्याआधी त्यांच्या माथ्यावर लादला आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला आहे. रद्द केलेली वाटद येथील एमआयडीसी पुन्हा जिवंत केलीत कोणासाठी आणि कशासाठी जनतेला काय हवंय ते पाहा तुमच्या कॉन्टॅक्टर मित्राला काय पाहिजे हे नको, अशी उदय सामतांच्या होमग्राउंडवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रत्नागिरी झालेल्या प्रचार सभेत मतदारांना साद घालण्यासोबतच सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे ठाकरेंचे उमेदवार बाळ माने, राजापूरचे उमेदवार तथा आमदार राजन साळवी, गुहागरचे उमेदवार तथा आमदार भास्कर जाधव, माजी मंत्री रवींद्र माने आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा की अदानीचा?

मला कळलं की कोल्हापूर राधानगरी येथे यांनी अदानीच्या प्रकल्पाला पाणी विकलं, हा महाराष्ट्र कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राहणार आहे की अदानींचा होणार आहे, असा खडा सवाल त्यांनी केला. सगळं काही गुजरातला पळवत आहेत महाराष्ट्राचे मंत्रालय सुद्धा यांनी उद्या गुजरातला नेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी समाचार घेतला. आपले सरकार आल्यावर मी पुन्हा नवे उद्योग आणल्याशिवाय राहणार नाहीं असेही त्यांनी सांगितले.
Uddhav Thackeray In Kolhapur: कोल्हापुरात उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचा गेम चेंज केला, दिली ५ मोठी आश्वासने

शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी वडिलांनी ठेवलं

सगळे उद्योग आणि वित्तीय केंद्र गुजरातला, महाराष्ट्रात काही शिल्लक ठेवणार आहात का नाही? की महाराष्ट्रात केवळ काय तांडा फिरवणार आहात, अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. तर ‘यांना ओरिजनल शिवसेना नको, उद्धव ठाकरे नको, हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने तुम्हाला न्यायचा आहे? असा सवाल उपस्थित करत ‘आम्ही अडीच वर्षे न्याय मागत आहोत, आम्ही हा न्याय उद्धव ठाकरेंसाठी तर देशातील जनतेसाठी मागत आहोत. शिवसेना हे नाव माझ्याकडेच आहे माझ्या आजोबांनी वडिलांनी ते नाव ठेवले आहे यासंदर्भात मी कोणाचाही आदेश मानणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

अवदासा भाजपाला सुचली म्हणून..

बाळ माने तुम्ही मगाशी आठवण काढली ते क्षण सुवर्णअक्षरात लिहून ठेवावा असा होता. तेव्हा आपल्याकडे काही नव्हतं, नगरसेवक निवडून आले तरी आपल्याला अप्रूप वाटायचं, त्यावेळी वामनराव महाडिक आमदार म्हणून निवडून आले तेव्हा केवढं कौतुक वाटलं. त्यानंतर वामनराव महाडिकच पहिले खासदार झाले, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. देशासाठी हिंदुत्वासाठी आणि राज्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे म्हणत शिवसेना आणि भाजप एकत्र राहिली होती. मग अशी कोणती औदसा भाजपाला सुचली की जे काही ते होतं उद्दिष्ट गाठल्यानंतर तुम्ही संकट काळात तुमच्यासोबत राहिलेल्या शिवसेनेला तुम्ही बाजूला सारून टाकले तुमचे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पंतप्रधान झाले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मनातील सल बोलून दाखवली.

‘शिवसेना नाव वडील आणि आजोबांनी ठेवलं, याबाबत कोणाचाही आदेश मानणार नाही,’ उद्धव ठाकरेंचा रोख कोणाकडे?

२०१४ साली युती तुटल्याची आठवण

२०१४ साली उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवस बाकी असताना मला खडसेंचा फोन आला की, आता आपलं काही जुळणार नाही आम्हाला वरून फोन आला की, युती नको आणि म्हणूनच मग हे भूत आले उमेदवारी दिली. पण आम्ही शब्दाला पक्के आहोत. २०१९ साली आम्ही दिलेला शब्द पाळला आणि मंत्री बनवलं त्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये आणि आता अडीच वर्षात उद्योग मंत्री म्हणून तुम्ही घरचे उद्योग सोडा आपण बाहेरचे उद्योग किती केले, हे सांगा असा खडा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

CM Eknath Shinderatnagiri vidhan sabhathackeray on bjpUday SamantUddhav Thackerayउद्धव ठाकरेंचे रत्नागिरीतील भाषणठाकरेंची भाजपवर टीकामंत्री उदय सामंतमुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे काय म्हणालेरत्नागिरी मतदारसंघातील प्रचारसभा
Comments (0)
Add Comment