मुंबई, दि. ५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३ लाख ८४ हजार ६९ पुरुष मतदार, २ लाख ५७ हजार ३१७ महिला दिव्यांग मतदार, तसेच ३९ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार आहेत. पुणे येथे ८८ हजार ९३७ दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये ४८ हजार ६२६ पुरुष, ४० हजार ३०१ महिला आणि १० तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ३८ हजार १४९ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये २१ हजार ५७३ पुरुष मतदार, १६ हजार ५७३ महिला मतदार आणि ३ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत.
दिव्यांग मतदारांची सर्वात कमी नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे ६ हजार ४३ दिव्यांग मतदारांची नोंद आहे. यामध्ये ३ हजार ७१० पुरुष आणि २ हजार ३३३ महिला दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
राज्यात तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ३९ आहे. सर्वाधिक तृतीयपंथी दिव्यांग मतदार औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. एकूण १२ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. पुणे जिल्ह्यात १०, नांदेड जिल्ह्यात ६, ठाणे जिल्ह्यात ३, आणि पालघर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी २ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. याशिवाय मुंबई उपनगर, लातूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १ तृतीयपंथी दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत.
0000