आजचे राशिभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : धनुसह २ राशींना गुंतवणुकीतून नुकसान! तणाव वाढेल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Today Horoscope 6 november in Marathi, आजचे राशीभविष्य:  आज ६ नोव्हेंबर बुधवार असून कार्तिक शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. तसेच पांडव पंचमी आणि ज्ञानपंचमी म्हणून या दिवसाला ओळखले जाते. आज मूळ नक्षत्र असून सुकर्मा योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होईल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : धनुसह २ राशींना गुंतवणुकीतून नुकसान! तणाव वाढेल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 6 november 2024 :
आज ६ नोव्हेंबर बुधवार असून कार्तिक शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. तसेच पांडव पंचमी आणि ज्ञानपंचमी म्हणून या दिवसाला ओळखले जाते. आज मूळ नक्षत्र असून सुकर्मा योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होईल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कोणत्याही कामात यश नक्की मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. पगार वाढ होऊ शकते ज्यामुळे आनंदी असाल. कौटुंबिक तणाव सुरु असेल तो संपेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. जोडीदारापासून काही लपवू नका. जोडीदाराच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – आर्थिक स्थिती मजबूत

आज कामात सहकाऱ्यांशी सावध राहावे लागेल. कोणाच्याही सल्ल्यानुसार वागू नका. वरिष्ठांकडून तुम्हाला ऐकावे लागेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कोणत्याही कामात यश नक्की मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. विष्णुसहस्त्रनामाचे पठण करा

वृषभ – पगारवाढ होईल

आज तुम्ही एखाद्या नातेवाईकाला मदत कराल. त्यांच्यासाठी पैशांची व्यवस्था कराल. यामुळे भविष्यात फायदा होईल. नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी चांगला दिवस असेल. पगार वाढ होऊ शकते ज्यामुळे आनंदी असाल. कौटुंबिक तणाव सुरु असेल तो संपेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. जोडीदारापासून काही लपवू नका.
आज भाग्य ९९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा

मिथुन – कामात मेहनत घ्यावी लागेल.

आज व्यावसायिक कामात तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. ज्यामुळे तुम्ही सहज यशाच्या पायऱ्या चढाल. जोडीदाराच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा

कर्क – नुकसान होईल

आज तुमच्या कामाचे ओझे वाढेल, ज्यामुळे तणावात असाल. वरिष्ठांची मदत घ्याल, ज्यामुळे आर्थिक मदत देखील मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी कोणावरही विश्वास ठेवू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. योग आणि प्राणायमचा अभ्यास करा

सिंह – वाद घालणे टाळा

आज मुलांच्या लग्नातील अडचणी दूर होतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. तुम्गही उधार दिलेले पैसे आज मिळतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्राच्या मदतीने तुम्ही पुढे जाल. शेजाऱ्यांशी वाद घालणे टाळा.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे १०८ वेळा नामस्मरण करा

कन्या – तणाव निर्माण होईल.

आज तुम्हाला ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम सोपावले जाईल. ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. मेहनत आणि समर्पणाने तुम्ही काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण न झाल्यास तणाव निर्माण होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.

तुळ – आरोग्याची काळजी घ्या

आज काम हाती घ्याल ज्यात यश मिळेल. परंतु, त्यामध्ये उशीर झाल्यास मन अस्वस्थ राहिल. व्यवसायासाठी भावाचा सल्ला घ्या. तुम्हाला पैशांची आवश्यकता भासेल. कोणत्याही शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देत असतील तर त्या वाढतील. वेळीच डॉक्टराचा सल्ला घ्या.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा

वृश्चिक – निराशेचा सामना करावा लागेल

आज तुम्हाला सर्व कामे पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे निराशेचा सामना करावा लागू शकतो. परंतु, तुम्ही हार मानू नका. आईच्या आरोग्याच्या समस्या वाढतील. ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. व्यवहार करताना अजिबात वितार करु नका.
आज भाग्य ७५ टक्के तुमच्या बाजूने असेस. देवी सरस्वतीची पूजा करा

धनु – विचारपूर्वक काम करा

व्यवसायात कोणतेही काम विचारपूर्वक करा. कुठेतरी गुंतवणूक करत असाल तर पालकांचा सल्ला घ्या, अन्यथा तुमचे पैसे बडू शकतात. कोणतेही नवीन काम करणे थांबवावे लागेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला राहिल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तू दान करा

मकर – आर्थिक संकट उद्भवतील

आज तुमच्या घरी पाहुणे येतील, त्यामुळे अधिकचे पैसे खर्च करावे लागतील. उत्पन्न आणि खर्च लक्षात घेऊन काम करा. भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणुकीतून आज तुम्हाला फायदा होऊ शकतो.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या

कुंभ – विचारपूर्वक निर्णय घ्या

आज तुम्हाला संयमाने वागावे लागेल, तरच यश मिळेल. व्यवसायासाठी नवीन डील फायनल करायची असेल तर विचार करुन निर्णय घ्या. बहिणीच्या लग्नातील अडथळे मित्राच्या मदतीने दूर होतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला.

मीन – आळसपणा सोडा

आज तुम्ही आळशीपणामुळे मागे व्हाल ज्यामुळे नुकसान सहन करावे लागेल. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. अन्यथा अडचणीत सापडाल. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. मुलांचे काम पाहून आनंदी व्हाल. जोडीदारासाठी सरप्राईज प्लान कराल.
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानाला शेंदूर अर्पण करा

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Aajche Rashi Bhavishya 6 novemberdaily rashi bhavishya 6 novemberHoroscope Today 6 november In marathimaharashtra times rashi bhavishya todaytoday rashi bhavishya 6 novemberबुधवारचे राशीभविष्य
Comments (0)
Add Comment