Numerology Prediction, 6 November 2024 : 6 नोव्हेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण आळस सोडा कामाला लागा हे लक्षात ठेवा. मूलांक 2 साठी घरात ताणतणाव वाढू शकतो. मूलांक 4 च्या लोकांना करिअरमध्ये संधी मिळेल. मूलांक 6 ने दस्तऐवज जपावे, कारण गहाळ होण्याची शक्यता आहे.मूलांक 8 साठी वैवाहिक जीवनात वाद तर मूलांक 9 च्या लोकांना वादावर तोडगा मिळेल. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – वेळेचा सदुपयोग करा, आळस सोडा
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही कामा व्यतीरिक्त इतर गोष्टीमध्ये व्यस्त राहता, ते योग्य नाही. वेळेचा सदुपयोग करा तरच लाभ होईल. कर्ज घेवू शकता. घरातील कामात मन लागणार नाही, तुम्हाला आळस जाणवेल.
मूलांक 2 – घरात ताणतणाव वाढू शकतो
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा ठिक आहे फक्त बोलण्यावर नियंत्रण असू दे. जे बोलाल त्यात खरेपणा हवा. एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करेल. घरात ताणतणाव होवू शकतो.
मूलांक 3 – कौतुक होणार , व्यवसायात बदलासाठी वेळ उत्तम
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही तुमच्या विचारांना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे तुमचं काम सुकर होऊ शकतं. घाईघाईमध्ये काम करू नका आणि तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 4 – करिअरमध्ये संधी मिळेल
मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. इतरांसोबत टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामात फोकस केला तर प्रगती होईल. आज काही कामांसाठी जास्त वेळ जावू शकतो. व्यवसायात प्रगती आहे. घरातही थोडा वेळ द्या, तणाव कमी होईल.
मूलांक 5 – कामे पटापट मार्गी लागतील
मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही जे काम हाती घ्याल ते तातडीने पूर्ण कराल. काही गोष्टींसाठी शॉर्टकट्स वापरण्याचा विचार करू शकता, पण तसे करु नका त्यामुळे तुमचे नुकसान होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. दानधर्म कराल, त्यामुळे मानसिक शांतता मिळेल.
मूलांक 6 – दस्तऐवज जपा, गहाळ होण्याची शक्यता
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. महत्त्वाचे दस्तऐवज जपून ठेवा, हरविण्याची शक्यता आहे. कोणी तुमच्याशी महत्त्वाची बोलणी करायला आले तर जेवढे कामाचे आहे तेवढेच बोला. घरात वातावरण ठिक आहे पण तुम्ही काही घरगुती कामे बाकी आहेत ती पूर्ण करा.
मूलांक 7 – ताणतणाव वाढ, तब्येतीची काळजी घ्या
मूलांक 7 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही काही कारणामुळे समस्या निर्माण होतील. ताणतणाव वाढल्यामुळे तब्येत बिघडू शकते. तुमच्या मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. घरातल्यांसोबत वेळ व्यतीत करा तुमची काळजी, ताणतणाव कमी होईल.
मूलांक 8 – वैवाहिक जीवनात वाद
मूलांक 8 साठी दिवस फारसा ठिक नाही. वैवाहिक जीवनात वादाचे वारे वाहत आहेत. भांडणांमुळे तुम्ही अस्वस्थ असाल. जुने मित्र भेटल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अभ्यास करावा, तसेच वेळेचा सदुपयोग करावा.
मूलांक 9 – वादावर तोडगा मिळेल
मूलांक 9 साठी आजचा दिवस चांगला आहे तुम्हाला एखादे काम खूप दिवसांपासून करायचे होते ते करण्याची संधी मिळेल. एखादा वाद जो खूप दिवसांपासून सुरु आहे त्यावर तोडगा निघेल. आथिक स्थिती ठिक असेल. व्यवसायात कामे वाढतील