लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या पक्षाच्या वाट्याला महायुतीत कमीच जागा आलेल्या आहेत. त्यातही त्यांच्या अडचणी बंडखोरीमुळे वाढल्या आहेत.
काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर राज्यातील सर्व लढतींचं चित्र स्पष्ट झालं. राज्यात विधानसभेच्या २८८ जागांवर ४१४० उमेदवार लढत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या ५३ पैकी ८ जागांवर त्यांच्यासमोर मित्रपक्षांच्या बंडखोरांचं आव्हान आहे. आधीच शरद पवारांचं आव्हान असताना आता अजित पवारांना महायुतीतून झालेल्या बंडखोरीचा सामनादेखील करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांची दुहेरी अडचण झालेली आहे.
अजित पवारांच्या १३ उमेदवारांविरोधात शिंदेसेना, भाजपच्या १३ जणांनी बंडखोरी केली होती. पैकी ५ जणांनी काल माघार घेतली. पण अद्यापही ८ जणांचे अर्ज कायम आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवारांची अडचण झालेली आहे.
अजित पवारांना महायुतीमधूनच कुठे कुठे धोका?
१. शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक विरुद्ध बुलेट पाटील (शिंदेसेना)
२. मोर्शी- देवेंद्र भुयार विरुद्ध उमेश यवलकर (भाजप)
३. आष्टी- बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस (भाजप)
४. देवळाली- सरोज अहिरे विरुद्ध राजश्री आहेर (शिंदेसेना)
५. वांद्रे पूर्व- झीशान सिद्दीकी विरुद्ध कुणाल सरमळकर (शिंदेसेना)
६. अमळनेर- अनिल पाटील विरुद्ध शिरीष चौधरी (भाजप)
७. अमरावती- सुलभा खोडके विरुद्ध जगदीश गुप्ता (भाजप)
८. जुन्नर- अतुल बेनके विरुद्ध आशा बुचके (भाजप)
कुठे कुठे बंडखोरांची माघार?
१. अणुशक्ती नगर- सना मलिक विरुद्ध अविनाश राणे (शिंदेसेना)
२. दिंडोरी- नरहरी झिरवळ विरुद्ध धनराज महाले (शिंदेसेना)
३. उद्गीर- संजय बनसोडे विरुद्ध दिलीप गायकवाड (भाजप)
४. पाथरी- निर्मला विटेकर विरुद्ध रंगनाथ सोळंके (भाजप)
५. वसमत- राजू नवघरे विरुद्ध मिलिंद एबला