Shirur Vidhan Sabha Elections: शिरुर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला कडवं आव्हान देण्यासाठी महायुती आपली पूर्ण ताकद लावणार आहे. त्यासाठी भाजपचे प्रदीप कंद यांनी पूर्ण ताकद लावणार असल्याचं सांगितलं
सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी केला आहे. महायुतीची एकजुट आणि मतांमध्ये संघटित बळ निर्माण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. प्रदीप कंद यांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट केले की, महायुतीच्या नेतृत्वासाठी आणि माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरतो असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी माऊली कटके यांच्यामागे ताकत उभी केली आहे. माऊली कटके हे जनतेत ‘श्रावणबाळ’ आणि सेवाभावी नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. त्यांची साधी राहणी, मृदू भाषा, आणि जनसंपर्कातील तळमळ यांनी मतदारांवर ठसा उमटवला आहे. विकासकामे करत माणुसकी जपणारे, कोणाविषयी आकस न ठेवता मदत करणारे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
थेट जनतेशी संवाद
शिरूर मतदारसंघातील सत्ताधारी आमदार अशोक पवार यांना कटके यांनी जनतेशी थेट संवाद साधत जोरदार आव्हान दिले आहे. ‘ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) यांच्या विजयासाठी आक्रमक मोहीम’ सुरू केली असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी देखील जनतेत जाऊन आपला प्रचार सुरु केला आहे. शरद पवार यांच्या शिलेदाराला शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकत लावण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे शिरूर विधानसभेत अशोक पवार यांच्या तुल्यबळ असा उमेदवार अजितदादांनी दिला असल्याने अशोक पवारांसाठी चांगलेच आव्हान निर्माण झाल्या असल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत.