…म्हणून राज ठाकरेंनी सरवणकरांची भेट घेतली नाही? धक्कादायक कारण समोर

Sada Sarvankar on Amit Thackeray : निवडणूक कार्यालय आणि शिवतीर्थ यात फारसं अंतर नाही, त्यामुळे सरवणकर केवळ नाटक करत होते का? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटायला तयार नसल्यामुळे माझा नाईलाज झाला. त्यामुळे मी दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे, असं म्हणत शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला. मात्र राज ठाकरेंनी सरवणकरांची भेट का घेतली नाही, याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, की मी राज ठाकरेंना विधानसभेची रणनीती विचारली होती, मात्र त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. त्यानंतर परस्पर उमेदवार जाहीर केले, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याच वेळी शिंदेंच्या मनात राज ठाकरेंविषयीची नाराजी स्पष्ट झाली होती.

सरवणकर काय म्हणाले?

कालच्या दिवशी सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की मला राज ठाकरे यांची भेट घ्यायची आहे. त्यांना माहीम दादर विधानसभेचं गणित समजवून सांगायचं आहे. इथे ठाकरे गटाचे महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यात दुहेरी लढत झाली, तर शिंदेंच्या शिवसेनेची सगळी मतं ठाकरेंना जाऊन त्यांचा पराभव होईल. अमित ठाकरेंचा विजय होणं आवश्यक असेल, तर तिहेरी लढत होणं गरजेचं असल्याचं सरवणकर म्हणाले होते.

फक्त नाटक?

अर्जमाघारी घेण्याच्या अर्धा तास आधी सरवणकर राज ठाकरेंना भेटीची भाषा करत होते. निवडणूक कार्यालय आणि शिवतीर्थ यात फारसं अंतर नाही, त्यामुळे सरवणकर केवळ नाटक करत होते का? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे.
Satej Patil : छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदर, गादीचा सन्मान कायमच राखणार; कालच्या वादावर पडदा, सतेज पाटील झालं-गेलं विसरले

अमित ठाकरेंना कमी लेखण्याचा प्रयत्न?

माझी मतदारसंघाला गरज आहे, त्याच वेळी अमित ठाकरेंना माहीम-दादरमध्ये स्थान नाही, हे सरवणकरांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक व्यापाऱ्यांना मनसेचा त्रास असल्याचं सरवणकर म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे सरवणकरांना भेटायला तयार होणं शक्यच नव्हतं. अमित ठाकरे स्वतःच्या बळावर जिंकू शकत नाहीत, तिथे मनसेची काही ताकदच नाही. त्यांना आमचा टेकू लागणार आहे, असं सरवणकरांनी भासवण्याचा प्रयत्न केल्याचं हेमंत देसाई यांनी व्हिडिओमधून म्हटलं आहे.

Raj Thackeray : अमित ठाकरेंना कमी लेखण्याचा सरवणकरांचा प्रयत्न? राज ठाकरे ‘लढायचं तर लढा’ का म्हणाले? न झालेल्या भेटीचं धक्कादायक कारण

पर्यायाने, तुम्हाला लढायचं तर लढा, मी काही भेटणार नाही, असा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला. अमित ठाकरेंना भाजपचा पाठिंबा आहे. मात्र भाजपचे मतदारच जर मनसेला त्रासले असतील, तर कठीण आहे. माहीममध्ये मनसेचं काम नसेल, त्यांचं अस्तित्व नसेल, किंवा
शिवाजी पार्कच्या धुळीबाबत मनसेचं काही काम नसेल, तर मतं मिळवणं कठीण जाऊ शकतं.
Amit Thackeray : राज ठाकरेंमुळेच अमित ठाकरेंची वाट बिकट? सरवणकर तयार झालेले, शिवतीर्थावर निरोप पोहोचला, पण ‘त्या’ गोष्टीमुळे खोडा

गोळीबार प्रकरणात बदनामी

मनसेची ४० हजार आणि भाजपची ३० हजार मतं माहीम-दादरमध्ये आहेत. त्यावर अमित ठाकरे निवडून येतील असं गणित मांडलं जात आहे. सदा सरवणकर एकसंघ शिवसेनेतून जिंकत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बंदूक गोळीबार प्रकरणात सरवणकर यांचं नाव बदनाम झालं आहे. अशातच मनसे आणि भाजप यांच्या जवळिकीचे संकेत मिळालेल्या एकनाथ शिंदेंनी मनसेवर आगपाखड केली. याचे परिणाम कालच्या राज ठाकरेंच्या भाषणातही दिसले आणि पुढेही दिसत राहतील.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Amit ThackerayEknath Shinderaj thackeraysada sarvankarVidhan Sabha Nivadnukअमित ठाकरे विधानसभाएकनाथ शिंदे मनसे नाराजीमाहीम दादर विधानसभाराज ठाकरे कल्याण भाषणराज ठाकरे सदा सरवणकर भेट
Comments (0)
Add Comment