Bala Nandgaonkar : . भाजपचं समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचंही शेलारांनी स्पष्ट केल्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरे यांना भाजपचा पाठिंबा नाही का, असा सवाल विचारला जात आहे.
आशीष शेलार काय म्हणाले?
शिवडी येथे आयोजित मेळाव्यात आशीष शेलार बोलत होते. ज्या अपक्षाने भाजपचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला होता. त्यामुळे दोघेच राहिले, महाविकास आघाडी आणि मनसे. मतदारांचा विचार करुन उमेदवार कोण, हे पाहिले तर बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी हे दोघे उभे आहेत. त्यामुळे काही प्रमेय ठरवून मूल्यमापन करावे लागेल, असे शेलार म्हणाले.
ठाकरेंवर टीकास्त्र
उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं जाईल. शिवडी हा वारकऱ्यांचा विभाग आहे. उद्धवजी आषाढीला पंढरपूरला गेले, पण पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. करोना काळात जेव्हा लोक देवाचा धावा करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरं बंद केली. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं. त्यावेळी वारी रोखली आणि एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना मदत केली असता, त्याची चेष्टा केल्याचंही शेलार म्हणाले.
BJP supports MNS : जिथे उमेदवारीवरून ठिणग्या, तिथे अखेर भाजपने डाव टाकला, मनसेला ‘दिलसे’ पाठिंबा जाहीर
लालबागच्या राजाची परंपरा साळवींनी खंडित केली
‘उबाठा’चा उमेदवार कोण, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही टीव्हीवर पाहिलं की, अजय चौधरींना उमेदवारी दिली, तेव्हा सुधीर साळवी यांचे समर्थक आक्रमक झाले. मात्र, हे भोग आहेत. करोना काळात गणेश भक्त सांगत होते की गर्दी नको, ऑनलाइन दर्शन घेऊ, आम्हाला उत्सव साजरा करु द्या. पण सुधीर साळवींनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चाटूगिरी केली. गणेश भक्तांना काय वाटेल, याचा विचार न करता उद्धव ठाकरेंच्या हुकुमाखातर लालबागच्या राजाची १०० वर्षांची परंपरा खंडित केली. त्यामुळे सुधीर साळवी त्याचे परिणाम भोगत आहेत. अजय चौधरी निकालाच्या दिवशी २३ नोव्हेंबरला भोगतील. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता पूर्ण ताकदीने कामाला लागावं आणि मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावं, असे आवाहन आशीष शेलार यांनी केलं.