जिथे उमेदवारीवरून ठिणग्या, तिथे अखेर भाजपने डाव टाकला, IPL ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूची एन्ट्री, शेवटचा सामना कधी खेळला?

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून येत्या ९ नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार की काँग्रेस आपली जागा राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका करत गंभीर आरोप केला आहे. शिवसेना ठाकरे गटाला प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही, पैसे घ्यायचे आणि आयात उमेदवाराला उमेदवारी द्यायची असा प्रकार ठाकरे गटात सुरु असल्याचा गौप्यस्फोट हेमंत पाटील यांनी केला आहे.

३. २०१९ निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विश्वासघाताचा खेळ केला. त्यांच्या या कृत्याची शिक्षा देण्यासाठी पक्ष फोडण्यात आले आणि ते गरजेचे होते, अशी भूमिका विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम येथून रिंगणात असलेल्या भाजपच्या आशीष शेलार यांनी ‘मटा कट्टा’ येथे मांडली. राज्यातील राजकीय सद्यस्थितीवर टीम मटाने विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलास आणि थेट उत्तरे त्यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर…

४. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तातडीने विमान नाशिकमध्ये दाखल झाले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यामध्ये एबी फॉर्म नव्हते. ते स्थानिक पक्ष कार्यालयाकडेच उपलब्ध होते. विमानातून केवळ शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब चौधरी आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीतून पुढे आली आहे.

५. शिवडी विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन सुधीर साळवी आणि विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्यात खेचाखेच झाली, तिथेच भाजपने मनसेच्या पाठीशी बळ लावल्याने नांदगावकरांचे पारडे जड मानले जात आहे.

६. चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये राहणाऱ्या इरफाना आयास शेख (वय ३६) यांच्या घरासमोर राहणारे परवीन शेख यांच्या कुटुंबातील मुले ३ नोव्हेंबर रोजी रात्री फटाके वाजवत होती. त्या आवाजामुळे इरफाना यांचा दीड महिन्याचा नातू घाबरत होता. त्यातून इरफाना आणि परवीन यांच्यात वाद झाले. या प्रकरणी दोघीही एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तेथे त्यांच्यात तडजोड देखील झाली, परंतु घरी येऊन परवीनाच्या कुटुंबाने इरफाना यांच्या घरातील सदस्यांना मारहाण सुरू केली. बातमी वाचा सविस्तर…

७. बिहारच्या स्वर कोकीळा शारदा सिन्हा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री ९.२० वाजता त्यांनी दिल्लीतील एम्स रुगणालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. छठ पूजेच्या गाण्यांना लोकप्रिय झालेल्या पद्मभूषण शारदा सिन्हा यांनी छठ पूजेच्या पहिल्याच दिवशी जगाचा निरोप घेतला. त्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या. गेला एक आठवडा त्या रुग्णालयात दाखल होत्या.

८. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. पेन्शनधारक कल्याण विभागाने सर्व पेन्शनधारकांसाठी नवीन नियम जाहीर केला असून यापुढे पेन्शनसाठी पात्र कुटुंबातील सदस्यांच्या यादीतून मुलीचे नाव वगळता येणार नाही. पेन्शनधारक कल्याण विभागाने नवीन नियमांतर्गत मुलींना आर्थिक सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अविवाहित, विवाहित आणि विधवा मुलींनाही निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकेल.

९. बॉलीवूड अभिनेत्री रकुलप्रीत तिच्या आरोग्याबाबत खूप सतर्क असते. ती अनेकदा लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रवृत्त करते. याशिवाय ती लोकांना पर्यावरण वाचवण्यासाठी जागरूकही करत असते. पण आता तिच्या एका जुन्या मुलाखतीमुळे ती वादात सापडली आहे.

१०. बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य सध्या फारच संकटात सापडले आहे. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पण अशातच त्याने रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये सुद्धा कॅमिओ भूमिका साकारली. त्याला पुन्हा एकदा सिने पडद्यावर पाहून त्याचे चाहते खुश झाले.

Source link

maharashtra top 10 headlinestoday highlightstoday latest newstop 10 headlinesआजच्या ठळक घडामोडीआजच्या ताज्या बातम्याटॉप १० हेडलाईन्समहाराष्ट्र टॉप १० हेडलाईन्स
Comments (0)
Add Comment