मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात खदखद

Kudal Vidhan Sabha : माझ्यामागून आलेले अनेक जण मंत्री झाले, मी अजून दाढी किती पिकवायची? असा सवाल निलेश राणे यांनी विचारला

Lipi

प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघात महायुतीचे निलेश राणे तर महाविकास आघाडीचे वैभव नाईक यांच्यात मुख्य लढत होणार आहे. निवडणुकीत प्रचार सभांनी जोर धरला आहे, आरोप प्रत्यारोपही होऊ लागले आहेत. साधं एमबीए देणारे इन्स्टिट्यूट आपल्याकडे नाहीत, यासाठी दानत असावी लागते, खोटे पक्षप्रवेश आम्ही करून घेत नाही, अशी टीका माजी खासदार आणि शिवसेना उमेदवार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर कुडाळ येथील आयोजित सभेत केली.

यावेळी त्यांनी माझ्यामागून आलेले अनेक जण मंत्री झाले, मी अजून दाढी किती पिकवायची? असा सवाल विचारला. ज्या ठिकाणी माझ्या साहेबांचा पराभव झाला, त्याच ठिकाणी मला लोकांची सेवा करायची आहे. यासाठी मला संधी द्या. मला याच ठिकाणाहून निवडून यायचं आहे. येथील जनतेचा शैक्षणिक, आरोग्य, रोजगार असा लोकाभिमुख विकास करायचा आहे यासाठी मला संधी द्या, असेही भावनिक आव्हान माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी केलं.
Ashish Shelar : शिवसेना-राष्ट्रवादीकडून विश्वासघात, शिक्षा देण्यासाठी पक्ष फोडणं गरजेचं होतं, आशीष शेलार यांचं स्पष्ट मत
नारायण राणे यांनी विधिमंडळात अनेक भाषणं केली, त्याचा प्रभाव आजही माझ्यावर आहे. राणे साहेबांनी विधिमंडळ हलवून सोडलं. त्यांची अभ्यासपूर्ण भाषण होती. या उलट या वैभव नाईक याने विधिमंडळात एक जरी भाषण केलं असेल तरी मला दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी नाईक यांना दिलं. २००९ पासून माझी सभागृहात जायची इच्छा होती. कुडाळ मालवणचा विकास रखडला आहे. मच्छीमारांचे प्रश्न अनेक आहेत. पर्यटन, रोजगार हे प्रश्न आहेत. या आमदार वैभव नाईक यांनी काहीच केलं नाही असाही घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.

Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात खदखद

राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे मेडिकल कॉलेज सुरू केलं आणि त्याला विरोध म्हणून ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले, पण यात शासकीय महाविद्यालयाची आज अवस्था काय आहे पहा. त्यामध्ये जनावर सुद्धा शिकू शकत नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी ठाकरेंचा समाचार घेतला.
Rupesh Mhatre : बंड मागे, तरी हकालपट्टी; वरुण-आदित्य यांच्यावरुन टीका जिव्हारी, उद्धव ठाकरेंचा तडक निर्णय
मला रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीच राज्यसभा विधानपरिषदेमध्ये जाणार का असे विचारलं होतं पण मी नम्रपणे ते नाही सांगितलं. ज्या ठिकाणी साहेब पडले त्याच ठिकाणी मला निवडून यायचं आहे. आणि काम करून दाखवायचं आहे. आणि येत्या पंधरा दिवसात येथील जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून येणार असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हल्ली मला रागच येत नाही

आणि आता मला हल्ली राग येत नाही. विरोधक धत आहेत हा कुठे सापडतो का मिळतो का याला भडकवला पाहिजे, पण विरोधकांना माहिती नाही मला हल्ली राग येत नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी विरोधकांचे मनसुबे मी ओळखून आहे असाच अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला.

वैभव नाईक यांचे खोटे पक्षप्रवेश

वैभव नाईक यांनी केलेल्या पक्षप्रवेश किती दिशाभूल करणारे आहेत असं सांगणारा एक व्हिडिओज निलेश राणे यांनी फेसबुक पोस्ट केला आहे. यामध्ये जामसंडे, त्रिंबक, आदी गावांमधील पक्षप्रवेश कार्यक्रमांचा समाचार घेत हे पक्षप्रवेश किती खोटे असल्याचे आहेत असं सांगत वैभव नाईक यांचा समाचार घेतला आहे.

एमबीए इन्स्टिट्यूटबाबत राणे काय म्हणाले?

इतकंच नाही तर ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एमबीए इन्स्टिट्यूट आणायला किती जागा लागते आणि ते आपण करणार एमबीएसाठी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आई-वडील आपले घरदार विकून आपल्या मुलाला मुलीला एमबीए करतात पण ही परिस्थिती आपण बदलणार आहोत, यासाठी दानत असावी लागते असं सांगत उच्चशिक्षण क्षेत्रातील मोठे दिलासादायक आश्वासन त्यांनी दिले आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Narayan RaneNilesh Ranesindhudurg newsVaibhav NaikVidhan Sabha Nivadnukकुडाळ विधानसभानिलेश राणे दाढी पिकवणेनिलेश राणे मंत्रिपद मागणीनिलेश राणे सिंधुदुर्ग सभावैभव नाईक नीलेश राणे
Comments (0)
Add Comment