महाराष्ट्र तुमचं पायपुसणं नाही! तुम्हालाच पुसून टाकेल; उद्धव ठाकरेंची विरोधकांवर खरमरीत टीका

Uddhav Thackeray At Ratnagiri: उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी रत्नागिरीत पोहोचले होते. तिथे त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. महाराष्ट्र हे तुमचं पायपुसणं नाहीये, तर ते तुम्हाला पुसून टाकेन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Lipi

प्रसाद रानडे, रत्नागिरी: आपला महाराष्ट्र असा काही लेच्यापेचांचा नाही तो कोणी पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही, कोणी किती पैसेवाला असू दे पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वाभिमान जिद्द आणि एक लढाऊ बाणा आहे. तो कोणी कितीही पैसेवाला उतरला तरी विकला जाऊ शकत नाही. विकत घेऊ शकत नाही. लोकसभेला मी याच मैदानात आलो होतो तुम्ही सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिलेत. पण, खाली सिंधुदुर्गमध्ये जरा डचमळलो. पण, मी तिकडे तिन्ही मतदारसंघात जाऊन सभा घेणार आहे, असं सांगत त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही टीका केली आहे. महाविकास आघाडीचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळ माने आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासाठी मंगळवारी रत्नागिरी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने, राजापूरचा उमेदवार आणि आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, जे घराणेशाहीचे आरोप आमच्यावर करत आहेत ते इकडे दोन भाऊ खाऊ आणि तिकडे दोन भाऊ आणि एक वडील बसलेत खायला कोकण अशा शब्दात ठाकरे यांनी सामंत व राणे यांचा समाचार घेतला. महाराष्ट्राचे, कोकणाच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झाला आहे, हे मोठे वळण आता आल आहे. आता मशाली धगधगू लागल्या आहेत. कोकण कुणाचं गुंडांचं की माझ्या कोकणवासियांचं हे आता तुम्ही ठरवायचं. मी बोलून जातोय ठरवणारे तुम्ही आहात हे शिवशाही मानणाऱ्या सैनिकाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात द्यायचा आहे, की हा गुंडांच्या हातात द्यायचा आहे, हे तुम्ही ठरवा, असं भावनिक आवाहनही त्यांनी केले. उत्सव तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री आम्ही केल्यानंतर त्यावेळी व आता उद्योग मंत्र्यांनी घरातले सोडा पण बाहेरचे किती उद्योग केले? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला.

प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण; दहा रुपयात पोटभर अन्न

लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये येईपर्यंत संपतात इतकी महागाई करून ठेवली आहे. पण, आपलं सरकार आल्यानंतर दहा रुपयात गरिबांना पोटभर अन्न व मुलींना ज्याप्रमाणे उच्चतंत्र शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला सुद्धा आपले सरकार सत्तेत आल्यानंतर मोफत शिक्षण दिले जाईल, असे आश्वासन देणारी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथील सभेत केली. युती शासनाच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युतीच्या काळात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवून दाखवले होते. आपले सरकार आल्यानंतर हेच पाच जीवनावश्यक भाव वस्तूंचे भाव आम्ही पुन्हा स्थिर ठेवून दाखवू असेही आश्वासन त्यांनी दिल.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका

बदलापूरमध्ये घडलेली जी दुर्दैवी घटना आहे. त्या मुलीच्या आईला तुम्ही हिम्मत असेल तर देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ या तिघांनी तुम्ही त्या मुलीच्या आईला पंधराशे रुपये देण्याची हिंमत दाखवावी. जोडे खायचे असतील तर जा तिकडे, अशी टीका ठाकरे यांनी केली. त्या माऊलीला दहा दहा पंधरा पंधरा तास पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवलं. यांच्या सरकारमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आम्ही निर्माण करू असेही आश्वासन देत त्या महिला पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीची दखल त्वरित घेतली जाईल असं त्यांनी सांगितल.

महाराष्ट्र तुम्हाला पायपुसणे वाटतो का पण तोच तुम्हाला पुसेल

कोकणात शिवछत्रपती महाराजांचा पुतळा उभा केला तो आठ महिन्यांमध्ये पडतो आणि मग मोदींनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली ती सुद्धा गुर्मीत मागितली तुम्हाला महाराष्ट्र म्हणजे वाटतो काय, पायपुसणी वाटतो काय, महाराष्ट्र तुमचं पायपुसणं होणार नाही, महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी मोदी यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधल्या शिवाय राहणार नाही. देव आहे त्यांचे दैवत आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सुरतेमध्ये सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. ज्या सुरतमध्ये हे गद्दार पळाले त्या सुरतमध्येही मी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. कारण, पुन्हा गद्दार तिकडे जाऊ नयेत या शब्दात त्यांनी महायुतीच्या सरकारवर टीका केली.

करोना काळात आपण चांगलं काम केलं मी असा कोणता गुन्हा अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना केला होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझ्यावर घरात बसण्याचा आरोप करता अरे मी घरात बसून लोकांची घर सांभाळली या शब्दात ठाकरे यांनी सुनावले. फक्त आमदार कसे फोडायचे सत्ता कशी आणायची याकडे यांचे लक्ष काय सट्टा बाजार तुम्ही लावला आहात का? असा सवाल तरी उपस्थित केला.

आपण मुंबईत मोर्चा काढला होता महाराजांच्या अपमान करणारा कोश्यारी नाही पाहिजे, पण नाही हटवला कारण अपमान महाराजांचा झालाय. तुम्ही मोदींवरती साधे बोलून बघा नाही तुमच्या घरी पोलीस आले तर मी काहीही हरायला तयार आहे. मोदींचा अपमान नाही करायचा पण महाराजांचा अपमान झाला तरी चालेल, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली.

Uddhav Thackeray: महाराष्ट्र तुमचं पायपुसणं नाही! तुम्हालाच पुसून टाकेल; उद्धव ठाकरेंची विरोधकांवर खरमरीत टीका

सुरतचा उल्लेख मी आकसाने नाही करत तर हे गद्दार जिकडे पळाले जी इंग्रजांची वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली होती. त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि हे त्या सुरतमध्ये पळाले आणि सुरत महाराष्ट्रात लुटते ती लूट ते थांबवू शकतील का आणि म्हणून मी सुरतमध्ये महाराजांचे मंदिर बांधणार आहे की पुन्हा कोणी गद्दारीतून तिकडे जाता कामा नाही इथे सुद्धा महाराज आहेत आणि तिकडे सुद्धा महाराज आहेत असं सांगितले.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

mahayutiRatnagiri newsUddhav Thackerayvidhan sabha election campaignVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरेनिवडणूक प्रचारमहायुतीरत्नागिरी निवडणूकविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment