Shani Margi 2024 : शनि कुंभ राशीत मार्गी! पुढील ५ महिने कर्कसह ४ राशींना आर्थिक चणचण भासणार, नात्यात दूरावा येण्याची शक्यता

saturn retrograde In aquarius :
ज्योतिषशास्त्रानुसार १५ नोव्हेंबरला शनि कुंभ राशीतून मार्गी होणार आहे. शनिच्या मार्गक्रमणामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. ज्योतिषशास्त्राला शनिला पाप ग्रह समजले जाते. १५ नोव्हेंबरला शनि सायंकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी कुंभ राशीत जाणार आहे. नवग्रहातील सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह शनि मानण्यात आले आहे. शनिचे मार्गीक्रमण झाल्यामुळे पुढील ५ महिन्यात कोणत्या राशींना कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Shani Margi 2024 : शनि कुंभ राशीत मार्गी! पुढील ५ महिने कर्कसह ४ राशींना आर्थिक चणचण भासणार, नात्यात दूरावा येण्याची शक्यता

Shani Margi 2024 In Kumbh Rashi :
ज्योतिषशास्त्रानुसार १५ नोव्हेंबरला शनि कुंभ राशीतून मार्गी होणार आहे. शनिच्या मार्गक्रमणामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. ज्योतिषशास्त्राला शनिला पाप ग्रह समजले जाते. १५ नोव्हेंबरला शनि सायंकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी कुंभ राशीत जाणार आहे. नवग्रहातील सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह शनि मानण्यात आले आहे.
शनि एका राशीत अडीच वर्षे राहातो. शनि जेव्हा पूर्वगामी परिस्थिती असतो तेव्हा अनेक राशींना समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु बरेचदा याचे शुभ फल देखील मिळते. शनिचे मार्गीक्रमण झाल्यामुळे पुढील ५ महिन्यात कोणत्या राशींना कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल जाणून घेऊया.

मेष – कामात अडचणी

मेष राशीच्या लोकांवर शनिची नजर असेल. त्यामुळे या लोकांच्या कामात अधिक अडथळे निर्माण होतील. नोकरदार लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. या काळाच तुमच्या अनेक इच्छा अपूर्ण राहातील. लव्ह लाईफमध्ये अनेक समस्या येऊ शकतात. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळणार नाहीत.

कर्क – व्यवसायात नुकसान

कर्क राशीच्या लोकांवर शनीची आठवी दृष्टी असल्यामुळे भाग्याची साथ कमी मिळेल. या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी लोकांकडून कमी सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात फारसा फायदा होणार नाही. तुमच्या मेहनतीनुसार फळ कमी मिळेल. या काळात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कौटुंबिक जीवन विस्तकळीत होईल. ज्यामुळे नात्यात खटके उडतील. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

सिंह – आर्थिक बजेट विस्कळेल

सिंह राशीवर शनिची सप्तम दृष्टी असेल. त्यामुळे तुमच्यावर कामाचा बोजा वाढणार आहे. ज्यामुळे तुम्हाला थोडा ताण सहन करावा लागू शकतो. तुमची आर्थिक स्थिती विस्कळू शकते. तुमचे खर्च प्रचंड प्रमाणात वाढतील. जोडीदारासोबतचे तुमचे नाते दूरावू शकते. तुम्हाला अहंकार येऊ शकतो. व्यवसायिकांना पार्टनरशीपमधून समस्यांना सामोरे जावे लागेल. कामात अडथळे येतील.

वृश्चिक – मतभेद वाढतील

वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव चौथ्या राशीमुळे पडत आहे. यावेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार नाही. जवळच्या लोकांकडून कमी सहकार्य मिळेल. या काळात प्रवास अधिक घडतील. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर नुकसान सहन करावे लागेल. वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला चढ- उतार सहन करावा लागू शकतो. जोडीदाराशी मतभेद कायम राहतील.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

कुंभ राशीची साडेसाती कधी संपेलशनिमुळे कोणत्या राशींना होणार नुकसान
Comments (0)
Add Comment