Married Life Issue Solution astrology : हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
देवउठणीपासून शुक कार्याला सुरुवात होते. यंदा देवउठणी एकादशी ही १२ नोव्हेंबर असणार आहे. देवउठणी एकादशीला काही उपाय केल्याने आपल्या शुभ परिणाम मिळतात. तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
वैवाहिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय
वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना हळदी-कुंकू लावा. तसेच त्यांच्या आशीर्वाद घ्या. यामुळे इच्छुकांचे लग्न लवकर होण्याची शक्यता अधिक दृढ होते. तसेच व्यक्तीला शुभ परिणाम मिळतात. तसेच श्रीविष्णूला पिवळी फुले देखील अर्पण करा
इच्छापूर्तीसाठी उपाय
तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवउठणी एकादशीला पिंपळाच्या झाडाजवळ जल अर्पण करा. तसेच भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा. यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच जीवनातील अडथळे दूर होतात.
सुखी वैवाहिक जीवनासाठी उपाय
तुम्हाला वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर देवउठणी एकादशीच्या दिवशी कच्च्या दुधात उसाचा रस मिसळून तुळशीला अर्पण करा. यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहातो. तसेच वैवाहिक जीवनातील आनंद वाढतो.
जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी
जर तुम्हाला अनेक संकंटानी घेरले असेल तर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी समोर तुपाचे ५ दिवे लावा. तसेच भगवान विष्णूसह तुळशीची पूजा करा. असे केल्याने सौभाग्य वाढते. जीवनातील अनेक समस्या दूर होतात. याशिवाय भगवान विष्णूला नारळ अर्पण करा.
टीप – सदर माहिती सामान्य आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ज्योतिष्यांचा सल्ला जरुर घ्या. महाराष्ट्र टाइम्स अशा कोणत्याही गोष्टींना समर्थन करत नाही.