Venus Transit 2024 in Sagittarius :आज रात्री अर्थात ७ नोव्हेबर २०२४ रोजी शुक्र ग्रह धनु राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे परिवर्तन योग तयार होईल. गुरु सध्या शुक्राची राशी वृषभमध्ये संक्रमण करत आहे आणि शुक्र आज रात्री गुरुच्या धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. अशाप्रकारे दोन्ही ग्रह एकमेकांच्या राशीत संक्रमण करत परिवर्तन योग तयार करतील. तसे पाहिले तर ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि गुरु हे एकमेकांचे विरोधी ग्रह मानले जातात, पण राशी परिवर्तन योगामुळे या विरोधी ग्रहांचा प्रभाव करियर आणि कौटुंबिक जीवनावर सकारात्मक आणि शुभ असेल. चला तर मग जाणून घेवूया मेष ते मीन राशीवर कशा प्रकारे शुक्राचे संक्रमण परिणाम करेल.
मेष राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
मेष राशीतील लोकांसाठी धनु राशीमधील शुक्राचे संक्रमण अनुकूल ठरणार आहे. विवाहाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम दिसतील. जोडीदार प्रत्येक गोष्टीत साथ देईल. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात अधिक रूची घ्याल.
वृषभ राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
धनु राशीत होणारे शुक्राचे संक्रमण वृषभ राशीतील लोकांसाठी संमिश्र परिणाम घेवून येणार आहे. तब्येतीची काळजी घ्या आणि तेलकट पदार्थ खाणे कमी करा. तुम्ही संशोधन किंवा एखादा गंभीर विषय शिकायचा ठरवत असाल तर लगेच शिकू घ्या, वेळ उत्तम आहे. आर्थिक स्थितीही चांगली असेल.
मिथुन राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
मिथुन राशीतील लोकांसाठी शुक्राचे संक्रमण अनुकूल असून जे प्रेमसंबंधात आहेत त्यांचा विवाह होण्याची शक्यता आहे. लांबच्या प्रवासाला जाणार आहात. घरच्यांसोबत सहलीचा प्लॅन कराल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात नफा असून तुम्ही जर भागिदारीत व्यापार करत असाल तर वेळ अतिशय उत्तम आहे. प्रत्येक कामात यश आहे.
कर्क राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
कर्क राशीतील लोकांसाठी शुक्राचे संक्रमण फारसे चांगेल नाही. आईच्या तब्येतीची खास काळजी घ्यावी लागले. घरात एखाद्या गोष्टीमुळे वाद होवू शकतात. या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. तुमचे मित्र तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. कोणतेही काम करताना सतर्क आणि सावध राहा.
सिंह राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
शुक्र संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी ठिक आहे खास करून तुमची लवलाइफ चांगली असेल. प्रियजनांसोबत सुखाचा काळ व्यतीत कराल. विवाहितांना संतती सुख मिळेल. एकूण हा संक्रमण काळ तुमच्यासाठी सुख समृद्धी घेवून येणारा आहे. व्यवसायात प्रगती आणि करिअरमध्ये यश आहे.
कन्या राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण चांगले आहे खास करून कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी असेल. आईसोबतचं नातं खूप मजबूत होईल. घरात धार्मिक कार्य किंवा सत्यनारायणाची कथा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे धन अधिक खर्च होवू शकते. तुम्ही मौल्यवान वस्तू खरेदी करण्यावर जास्त खर्च करणार आहात.
तुळ राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
तुळ राशीचे जे जातक लेखन आणि साहित्य क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी हे संक्रमण फायद्याचे आहे. लेखन कला, संवाद आणि क्रिएटीव्ह कामे करायला मिळतील आणि त्यात उत्तम यश मिळेल. भावंडांसोबत प्रवासाचे नियोजन कराल. घरात लहान मुले असतील तर त्यांच्या तब्येतीची खास काळजी घ्या. तसेच कामाचा अती ताण घेवू नका.
वृश्चिक राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
शुक्राच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे बोलणे अधिक मधुर आणि प्रभावी होणार आहे. कुटुंबाला जास्त वेळ देणार आहात. प्रियजनांसोबत जास्त वेळ व्यतीत केल्यामुळे ताणतणाव कमी होईल. परदेशातून आर्थिक लाभाची शक्यता असून गुंतवणुकीसाठी वेळ उत्तम आहे. गुंतवणुकितून चांगला लाभा मिळेल.
धनु राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे संक्रमण आरोग्यावर परिणाम करणारे आहे. तेव्हा तब्येत सांभाळा आणि बाहेरचे खाणे कमी करा. या कालावधीत तुम्ही अनेकजणांच्या भेटी घेणार आहात, त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर होईल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
मकर राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
मकर राशीचे जे लोक आयात-निर्यात किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी शुक्राचे संक्रमण सकारात्मक परिणाम घेवून येणार आहे. व्यवसायासाठी परदेशवारी होणार असून त्यातून तुम्हाला उत्तम लाभ मिळेल. लवलाइफमध्ये सावध राहा तुमच्या संबंधात गैरसमज निर्माण होवू शकतात. या काळात जास्त पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करू नका.
कुंभ राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
धनु राशीमध्ये होणारे शुक्राचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार असून समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. लवलाइफमध्ये असणाऱ्यांसाठी हा कालावधी उत्तम असेल. जीवनात सुख समृद्धीचे योग आहेत.
मीन राशीवर शुक्र संक्रमणाचा प्रभाव
मीन राशीसाठी शुक्राचे संक्रमण खास करून व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्तम आहे. तुम्ही कामात अधिक क्रिएटिव्ह असाल. तुम्ही कामात केलेले बदल सकारात्मक आणि अधिक लाभदायक असतील. व्यावसायिक जीवनात अचानक काही बदल होतील. एकूणच हे संक्रमण तुमच्यासाठी लाभदायक आहे.