बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी…

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आला असून, त्याला पाच कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा फोन लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचा संशय आहे. याआधी जीशान सिद्दीकीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Baba Siddiqui

मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गॅंगकडून घेण्यात आली. सलमान खान याच्या जवळचे लोक आपले शत्रु असल्याचे त्या पोस्टमध्ये म्हणण्यात आले. 14 एप्रिलच्या पहाटेच सलमान खानच्या घरावर लॉरेंस बिश्नोई गॅंगकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी हे दोघे खूप चांगले मित्र होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट गेल्या काही दिवसांपासून रचला जात असल्याचे देखील पोलिस तपासात उघड झालंय. या हत्येप्रकरणी पोलिसांकडून काही आरोपींना अटक देखील करण्यात आलीये. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आलाय.

धमकीच्या फोन प्रकरणात आता मुंबईतील खार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा फोन लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून करण्यात आल्याचे कळतंय. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. बाबा सिद्दीकीच्या हत्येतील प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, मला काही दिवसांपूर्वीच अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. मला त्या व्यक्तीने 5 कोटी रूपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जीवे मारणार असल्याचे फोनमध्ये सांगण्यात आले.
जमावाचं भांडण अन् निष्पापाचा घात; कुटुंबानं तरुण मुलगा गमावला, नेमकं घडलं काय?
सध्या या प्रकरणात पोलिस तपास करत असून फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर फक्त सलमान खान हाच नाही तर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी याला देखील जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. वडिलांच्या निधनानंतर जीशान सिद्दीकी याने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या. पोस्टच्या माध्यमातून आपल्याला न्याय हवा असल्याचे देखील जीशान सिद्दीकीने म्हटले होते.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी…

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. हेच नाही तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची माहिती मिळताच सलमान खान याने लीलावती रूग्णालयाकडे धाव घेतली होती. ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, त्यावेळी सलमान खान हा बिग बॉसचे शूटिंग करत होता. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. बाबा सिद्दीकी यांनीच सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील वाद मिटवल्याचे देखील सांगितले जाते.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

baba siddiquemumbaiजीशान सिद्दीकीबाबा सिद्दीकी हत्यामुंबईलॉरेंस बिश्नोई
Comments (0)
Add Comment