Mahalaxmi Scheme For Women: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने प्रचाराचा नारळ आज मुंबईत झालेल्या सभेत फोडला. या सभेत मविआघडून पाच मोठ्या आश्वासनांची घोषणा करण्यात आली.
भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी भाजप, RSS यांच्यावर हल्ला चढवला. एका बाजूला इंडिया आघाडी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि आरएसएस आहे जे हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट ते थेट बोलणार नाहीत. कारण त्याचे परिणाम भाजपला माहिती आहेत. त्यामुळेच ते छुप्या पद्धतीने संविधान कमकूवत करत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केली. देशातील प्रत्येक व्यवस्थेत आज ते एक विशिष्ट विचारसरणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील कुलगुरूंची यादी काढा. गुणवत्तेच्या आधारावर नाही तर आरएसएसशी संबंधित हा एकमेव निकष लावला जातोय.
निवडणूक आयोगावर दबाव टाकला जातो. ईडी, आयकर विभाग यांचा वापर करून सरकार पाडले जाते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पैसे देऊन आणि चोरी करून पाडण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. हे फक्त ३-४ अब्जाधीशांची मदत करण्यासाठी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
महालक्ष्मी योजना
राहुल गांधी यांनी यावेळी महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास महिलांना महालक्ष्मी योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील. तसेच राज्यातील सर्व महिलांना एसटी बसचा प्रवास मोफत असेल असे राहुल गांधींनी जाहीर केले.
भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली आहे. हे सरकार राज्यातील प्रत्येक कुटुंबातून ९० हजार रुपये काढून घेत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. हे तुम्हाला दीड हजार रुपय देण्याचे आश्वासन देतात. पण काम मात्र ते अदानी, अंबानी यांचे करतात.