‘बाळासाहेबांची प्रॉपर्टी’ जी गहाण टाकली होती, ती वाचवणारा हा एकनाथ शिंदे आहे, ठाण्यातून मुख्यमंत्र्यांचा घुमजाव

CM Shinde Thane Sabha Highlights from Vidhan Sabha Election: धनुष्यबाण, शिवसेना ही बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे पण ज्यांनी ती गमावली आणि गहाण टाकली होती, ती शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवणारा हा एकनाथ शिंदे आहे, अशी आज मुख्यमंत्री शिंदे यांची ठाण्यात तोफ धडाडली आहे.

Lipi

ठाणे : धनुष्यबाण, शिवसेना ही बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे पण ज्यांनी ती गमावली आणि गहाण टाकली होती, ती शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवणारा हा एकनाथ शिंदे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंवर प्रहार केला आहे. धनुष्यबाणाचा मानसन्मान रहावा, शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ नये, म्हणून परिणामांची पर्वा न करता आगीत उडी घेतली, असेही शिंदे यांनी निक्षून सांगितले. ठाण्यात आयोजित महायुतीच्या मार्गदर्शन मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘काँग्रेसने धनुष्यबाण विकून टाकला असता. मात्र आम्ही तो सोडवला आणि त्याचे पावित्र्य जपले. याच लोकांनी निवडणूक आयोगाला तक्रार करुन धनुष्यबाण गोठवून टाका, अशी मागणी केली होती. धनुष्यबाणाचे पावित्र्य तुम्हाला नाही मात्र आम्ही त्या धनुष्यबाणाचा मानसन्मान राहावा, शिवसैनिकाचे खच्चीकरण होऊ नये, म्हणून या एकनाथ शिंदेने आगीत उडी टाकली. परिणामांची पर्वा केली नाही आणि अडीच वर्षांतला वनवास दूर केला आणि टांगा पलटी, घोडे फरार याप्रमाणे सरकार उलथवून टाकले.’ यासोबतच ‘आताची मशाल ही क्रांतीची नाही, तर घर पेटवणारी मशाल आहे,’ अशी जळजळीत टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Raj Thackeray : लाडके भाऊ काय मेलेत का? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली
‘बाळासाहेब सांगायचे शिवसैनिक हेच सर्वात मोठे पद आहे. कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. कार्यकर्त्याला अडचणीत असताना नेत्याने जपले पाहिजे, असे नमूद करत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मविआने घातलेले स्पीडब्रेकर आम्ही हटवले आणि विकास प्रकल्प सुरु केले. एकीकडे विकासकामे आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना यावर सरकारने प्राधान्य दिले आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहिट झाली. हे मविआचे सरकार मात्र हप्ते भरणारे होते. त्यांच्यासारखे हप्ते घेऊन तुरुंगात जाणारे नाहीत.’

‘महायुतीची १० आश्वासने हा ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’

कोल्हापूरच्या सभेत महायुतीने दिलेली १० आश्वासने हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडक्या बहिणीला, वृद्धांना जादा पेन्शन, अंगणवाडी, आशासेविकांना मानधन, १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात ३० टक्के, सर्वांना अन्न आणि निवारा अशी आश्वासने दिली आहेत. महायुती सरकारने योजना राबवताना जातीधर्मात कधी भेदभाव केला नाही. या योजना कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचवल्या तर महायुतीच्या उमेदवांवर मतांचा धो धो पाऊस पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

चेंबूरमध्ये तुकाराम कातेंच्या कार्यालयाचे उद्घाटन

महायुतीचे चेंबूरचे उमदेवार तुकाराम काते यांच्या निवडणूक कार्यालयाचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी ते म्हणाले, चेंबूर हे मुंबईचे काळीज आहे. महायुतीचा हा बालेकिल्ला आहे. येथील पुनर्विकासाचे प्रश्न सोडवणार आहोत. तुकाराम काते आणि सुरेश पाटील यांना येथील जनता बहुमताने निवडून देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

CM Eknath Shindecm shinde attack on mvaMaharashtra nivadnuk updatesraj thackerayThane Vidhan Sabhaठाणे विधानसभेतील राजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा फोलमुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीकाराज ठाकरेंवर टीकाविधानसभा निवडणुकीच्या घडामोडी
Comments (0)
Add Comment