Raj Thackeray Latur Sabha Highlights for Vidhan Sabha Election : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाड्यातील पहिली सभा झाली. राज ठाकरेंनी सभेमध्ये बोलताना पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यासोबतच त्यांनी मराठवाड्यातील मूलभूत सुविधांवर बोट ठेवलं.
मराठवाड्यामध्ये महिलांना पळून नेण्याचं सर्वात जास्त आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ८०० फूट पाणी लागत नाहीये. माणसं मराठवाड्यात यायला तयारी नाहीत पण जायला तयार आहेत. विद्यार्थांच्या शिक्षणाचा विषय तुमचं लक्ष नाही जातीजातींमध्ये भांडण लावण्याचं काम केलं जातंय. जग कुठे चाललं आहे बघा, विमानतळापासून लातूरपर्यंत येईपर्यंत अर्धा तास गेला, का तर रोड खराब आहेत. सत्ता असून कोणत्याही सेवा देण्यात आल्या नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.
माझ्या महाराष्ट्रातील मुलांना रेल्वेमध्ये नोकऱ्या आहेत मुलांना हेच माहिती नव्हतं. त्यावेळेला आंदोलन केलं त्याची केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली आणि त्यानंतर मराठीमध्ये प्रश्नपत्रिका मराठीत येऊ लागल्या. हजारो मुलं रेल्वेमध्ये लागलीत, राज ठाकरे सत्ता नसताना करू शकतो तर उद्या माझ्या हातात सत्ता आली तर काय करेल. असेच राहा, अजून नेते मंडळी येतील, आरोप-प्रत्यारोप करतील, तुम्ही हसा टाळ्या वाजवा निवडणूक संपली. उन्हात त्यांनाच मतदान करा आणि पाच वर्ष बोंबलत बसा, असं म्हणत मतदारांना पुन्हा एकदा आपल्याकडे सत्ता देण्याचे आवाहन केले.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे जाहीर सभा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसे उमेदवार संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंह भिकाने अहमदपूर विधानसभा मतदारसंघ उमेदवार, शिवकुमार नागराळे, औसा विधानसभा मतदारसंघ उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला.