Devendra Fadnavis on Rahul Gandhi: ”भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे”.
हायलाइट्स:
- लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?
- भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे
- देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे”.
”भारत जोडो यात्रेदरम्यानची सुरू आहे तो अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं. जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल”, असा दावाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.