Numerology Prediction, 7 November 2024 : 7 नोव्हेंबर, शुक्र गुरु परिवर्तन योग आणि रवि योगाचा शुभ परिणाम सर्व मुलांकावर होणार आहे. मूलांक 1 सह या मूलांकाचा मानसन्मान होणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती आहे. या मूलांकाच्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि तपासणी वेळोवेळी करावी. जंक फूड खाणे बंद करावे. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – मान-सन्मान होणार
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुमचा मान-सन्मान होणार आहे. काही गोष्टी तुमच्या विचारांवर सकारात्मक परिणाम करतील. कायदेशीर गोष्टीत तुम्हाला यश मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिती चांगली आहे.
मूलांक 2 – नोकरी मिळण्याची शक्यता
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक असून कमाईत वाढ होणार पण त्याचबरोबर तुमचे खर्च देखील वाढतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. घरात वातावरण ठिक असेल.
मूलांक 3 – मनात अनेक शंका, काम करताना सावधान
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून प्रवासाचा योग आहे. काही कारणामुळे तुमचा इतरांसोबत संवाद होणार नाही. मनात शंकांचे काहूर असेल, काय करावे आणि करू नये या संभ्रमात तुम्ही असाल. आज कोणतेही काम करताना सावध राहा कारण चूक होण्याची शक्यता आहे.
मूलांक 4 – थांबलेली कामे पूर्ण होतील
मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक असून तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या बोलण्याचा आणि व्यक्तीमत्वाचा उत्तम प्रभाव समोरच्या व्यक्तीवर होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल.
मूलांक 5 – व्यवसायात तोटा होण्याची शक्यता
मूलांक 5 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. व्यवसायात थोडा तोटा होण्याची शक्यता आहे तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला ओरडा पडू शकतो. कामात फोकस राहा ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत नक्की मिळेल.
मूलांक 6 – घरात गोंधळाचे वातावरण, कामाचा ताण अधिक
मूलांक 6 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. घरात थोडे गोंधळाचे वातावरण असेल. ऑफिसमध्ये कामाचा प्रेशर वाढलेला असणार आहे. आज संकटांचा सामना होईल पण तुम्ही धैर्याने प्रत्येक गोष्टीचा सामना कराल.
मूलांक 7 – रणनीती यशस्वी, कामे वेळेत पूर्ण होणार
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे, तसेच कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी तुम्ही जी रणनीती आखणार आहात ती यशस्वी होणार आहे. उत्पन्नाचे नेवीन स्रोत खुले होतील त्याचा लाभ घ्या. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा समस्या वाढू शकतात.
मूलांक 8 -घरच्यांसोबत तणावाचे संबंध
मूलांक 8 साठी दिवस ठिक असेल, पण आई-वडिलांशी तसेच मुलांसोबत तुमचे संबंध थोडे तणावात्मक असतील. काळजी करू नका हे संबंध लवकरच सुधारतील. पाहुणे येणार आहेत त्यामुळे खर्च वाढेल तसेच पाहुण्यांना वेळ द्यावा लागेल.
मूलांक 9 – घरात मतभेद वाढण्याची शक्यता
मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेटी होतील. आज काही कारणामुळे बाहेरची व्यक्ती तुमच्या कुटुंबात मतभेदाचे वातावरण निर्माण करेल. वादविवादापासून दूर राहा. मतभेद वाढणार नाही याकडे लक्ष द्या.