sadahau khot controversial statement : सांगलीमधील जतमध्ये भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून केलेल्या टीकेनंतर त्यांच्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त विधान
शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसवाले असतील. देवेंद्र फडणवीसांना का घेरायला लागलेत माहितीय का? गायीची कास आहे त्याला चार थानं असतात. यामधील अर्थ वासराला पाजायचं आणि साडेतीन थानातील दूध आपणच हाणायचं पण फडणवीस म्हणत होते की गायीचं सगळं दूध वासराचं आहे. मी सगळं दूख वासरांनाच देणार मग पवार साहेबांना नऊवा महिना लागल्या आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं? पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या पण पवारसाहेबांना मानावं लागेल. ते म्हणताय की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का? असं वादगस्त विधान सदाभाऊ खोत यांनी केलं.