एक भाऊ भाजपकडून, दुसरा काँग्रेसकडून, तिसरा अपक्ष उभा, एकाच दिवशी, एकाच गावात शिंदे अन् ठाकरेंची सभा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Nov 2024, 9:04 am

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करताना भारतीय जनता पक्षाने ‘कलरकोड प्लॅन’ची वेगळी रणनीती आखली आहे. त्यानुसार भाजपने जिंकण्याची सर्वाधिक शक्यता, मध्यम शक्यता आणि अतिशय कमी शक्यता याआधारे मतदारसंघांना अनुक्रमे पिवळे, हिरवे आणि लाल असे रंग निश्चित केले आहेत. पिवळे मतदारसंघ हिरवे कसे होतील तसेच लाल मतदारसंघ पिवळ्या रंगात परावर्तीत होतील, याकडे लक्ष दिले जात आहे. बातमी वाचा सविस्तर…२. विधानसभा निवडणुक जवळ येत असल्याने आता प्रचारांचा धडाका पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच बुधवारी महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून सदाभाऊ खोतांनी पवारांवर निशाणा साधला परंतु आता खोत ट्रोल झालेले पाहायला मिळत आहे.

३. जळगावात पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवणाऱ्या बंडखोर उमेदवारांवर भाजप व शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरातील भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे व मयूर कापसे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, माजी खासदार ए. टी. पाटील आणि अमोल शिंदे यांच्यावर कारवाई न केल्याने त्यांना अभय तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.बातमी वाचा सविस्तर…

४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाशी आमने-सामने लढू शकत नाही. ते लढले तर पाच मिनिटांत पराभूत होतील. त्यांचा विषयच संपून जाईल. याचमुळे ते विकास, प्रगती, अर्थकारणाच्या नावाखाली राज्यघटनेवर मागून वार करतात, असा शाब्दिक हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चढवला. ९० टक्के जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझे पहिले लक्ष्य जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची ५० टक्के मर्यादेची भिंत तोडणे आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

५. विधानसभा २०२४च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि प्रचाराचा धुरळा उडायला सुरवात झाली. बड्या-बड्या नेत्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सभांचा सपाटा सुरू केलाय. अकोल्यातील बाळापूर मतदार संघातही एकाच दिवशी आणि एकाच गावात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

६. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या परिवाराचा एक सदस्य उमेदवारी करीत असून, प्रमुख शर्यतीत आहे. मंत्री डॉ. गावित भाजपकडून, त्यांचे एक बंधू काँग्रेसकडून, दुसरे अपक्ष आणि कन्यादेखील अपक्ष उमेदवारी करीत आहे. त्यामुळे या लढतींची राज्यभरात चर्चा रंगत आहे.

७. काही दिवस अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा चालू होती. केवळ अमेरिकाच नाहीतर जगभरातून या निवडणुकीकडे लक्ष लागलेले. अखेर काल या निवडणुकीचा निकाल समोर आला असून पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या निकालाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केलाय तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

८. अमेरिकन राष्ट्रपती निवडणूक निकालाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आणि दोन्ही निर्देशांकांनी, सेन्सेक्स आणि निफ्टीने, सुसाट वेगाने मुसंडी मारली. पण बीएसईचे सदस्य आणि अनुभवी गुंतवणूकदार रमेश दमाणी म्हणतात की बाजारातील सुरुवातीच्या उत्साहानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी स्थिरता किंवा घसरणीची स्थिती असू शकते त्यानंतर, नवीन उच्च पातळीची शक्यता असू शकते. दमाणी म्हणतात की सध्याचा कालावधी बाजारातील वेळ आणि किंमत सुधारणा म्हणून पाहिला जाऊ शकतो.

९. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायली आणि अर्जुन वेगळ्या घरात शिफ्ट होणार म्हणून प्रियाची चिडचिड चालू असते. अस्मिताला कोपऱ्यात घेऊन विचारते की हे असं कसं शक्य होऊ शकतं. कालपर्यंत हे दोघे घटस्फोट घेणार होते मग आता हे वेगळं राहण्याचा विचार कसा करू शकतात. यावर अस्मिता बोलते की बरं झालं हे होतंय यामुळे का होईना निदान पूर्णा आजीच्या समोर त्या सायलीच्या खरा चेहरा येईल आणि ती या घरातून पण जाईल.

१०. : टीम इंडियामधील सर्वात फिट खेळाडू म्हटलं की विराट कोहली, रविंद्र जडेजा. के.एल. राहुल, हार्दिक पंड्या हे खेळाडू डोळ्यासमोर येतात. कोणत्याही खेळासाठी शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त असणं खूप गरजेचं असतं. फिटनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे पण त्यासोबतच तुमचा आहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. फिटनेस हवा असेल तर तितकाच आहारही नियमित ठेवावा लागतो.

Source link

maharashtra times top 10 headlinestoday highlightstoday latest newstop 10 headlinesआजच्या ठळक घडामोडीआजच्या ताज्या बातम्याटॉप १० हेडलाईन्समहाराष्ट्र टाइम्स टॉप १० हेडलाइन्स
Comments (0)
Add Comment