Satara News: या प्रकरणात संबंधित युवकावर महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बोलवून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला आहे.
हायलाइट्स:
- ऐन निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघांत राडा
- मोबाईल स्टेटसवरून महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात तू तू मैं मैं
- मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले
”गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कोरेगाव मतदारसंघांमध्ये पोलीस यंत्रणेचा वापर करून जबरदस्तीने या ठिकाणी लोकांना धाक दाखवून पक्षांतर करण्याचा प्रयत्न होतोय. याचा निषेध करण्यात आलेला आहे. आचारसंहिता असताना पोलिसांनी पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याची भूमिका बजावू नये असं आमचं सांगणं असताना सुद्धा सातत्याने त्याच पद्धतीची कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक ही लोकशाही ने होऊ दे. विरोधकांची निवडणूक त्यांच्या हातातून गेली असल्यामुळे ते अशा गोष्टीचा वापर करत आहे. पोलिसांच्या माध्यमातून गेले दोन-तीन महिन्यापासून कार्यकर्त्यांना पक्षांतर करायला लावत आहे. याची यादी माझ्याकडे आहे. अशा पद्धतीने पोलिसांकडून दहशत होत असेल, तर त्याचा मी निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपावर महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, ”शशिकांत शिंदे यांना कामच काही उरलेलं नाही. आम्ही केलेली विकासकामे आणि लोक आमच्यासोबत येत आहेत, त्यामुळे त्यांचे डोके फिरले आहे. मागे काही दिवसांपूर्वी देखील ऊस पेटवला म्हणून आमच्यावर आरोप केला, हा सर्व स्टंट आहे. संबंधित युवकाने घाणेरडा स्टेटस ठेवला होता का? याच्या मुळात जावा…त्यांनी काहीच केले नाही का? मग यांच्या मुलाने केले का? मागील काही दिवसांपूर्वी देखील ऊस जो पेटवला यामध्ये देखील माजी आमदारांचा सहभाग आहे. त्यांनीच हे कट कारस्थान केले. त्यांची सोशल मीडियाची टीम यामध्ये सहभागी” असल्याचा आरोप यावेळी महेश शिंदे यांनी केला आहे