चलो पंढरपूर…! कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरसाठी धावणार ‘या’ स्पेशल ट्रेन्स, असे आहे वेळापत्रक

Kartiki Wari 2024: मध्य रेल्वेने कार्तिकी यात्रेसाठी डेमू विशेष गाड्या मिरज ते लातूर दरम्यान, चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मध्य रेल्वेने कार्तिकी यात्रेसाठी डेमू विशेष गाड्या मिरज ते लातूर दरम्यान, चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान १४ फेऱ्या होणार आहेत. तर, या काळात मिजर-पंढरपूर दरम्यान देखील विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांना पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणे सोपे होणार आहे.

■ मिरज-लातूर
गाडी क्रमांक ०१४४३ मिरज-लातूर कार्तिकी यात्रा डेमू विशेष ही १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान, मिरज येथून सकाळी सात वाजता सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता लातूर येथे पोहोचले. तर, गाडी क्रमांक ०१४४४ लातूर-मिरज कार्तिकी यात्रा डेमू विशेष ही १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान, लातूरहून सायंकाळी चार वाजता सुटेल. ती त्याच दिवशी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी मिरजला पोहोचेल. या गाडीला आरग, बेळकी, सलागरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जाठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुडुवाडी, शेंद्री, बार्शी टाउन, पांगरी, उस्मानाबाद, येडशी, कळंब रोड, मुरड, औसा रोड आणि हरंगुळ असे थांबे असणार आहेत. मिरज-कुडूवाडी

■ मिरज-कुडुवाडी
ही विशेष गाडी १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान धावेल. गाडी क्रमांक ०१४४७ कार्तिकी यात्रा अनारक्षित विशेष मिरजहून दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुटले. ती कुडुवाडी येथे त्याच दिवशी रात्री सात वाजता पोहोचले. तर, गाडी क्रमांक ०१४४८ कार्तिकी जत्रा अनारक्षित विशेष कुडुवाडी येथून रात्री नऊ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. ती मिरजला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री एक वाजता पोहोचेल. या गाडीला आरग, बेळंकी, सलागरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब असे थांबे असणार आहेत.
विधानसभेसाठी भाजपची जोरदार प्लॅनिंग; मतदारसंघातील विजयाच्या शक्यतेनुसार आखली ‘रंगीत’ रणनीती
मिरज-पंढरपूर कार्तिकी यात्रा विशेष
मध्य रेल्वे मिरज-पंढरपूर आणि मिरज-कुडूवाडी कार्तिकी यात्रा अनारक्षित विशेष गाड्या १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान, २० फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१४४९ कार्तिकी यात्रा अनारक्षित विशेष ही १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान, मिरजहून पहाटे पाच वाजता सुटेल. ती त्या दिवशी सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी पंढरपूरला पोहोचले. गाडी क्रमांक ०१४५० कार्तिकी यात्रा विशेष १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर येथून सकाळी नऊ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती त्याच दिवशी तीन वाजून ५० मिनिटांनी मिरजला पोहोचले. या गाडीला आरग, बेळंकी, सलागरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद आणि सांगोला हे थांबे असणार आहेत.

Source link

central railway special festival trainkartiki wariKartiki Wari special trainMiraj-Pandharpur Kartiki Yatra Specialpandharpur special trainspandhrpur special trainvitthal mandir pandharpurमध्य रेल्वेमिजर-पंढरपूर ट्रेनमिरज-कुडुवाडी रेल्वे
Comments (0)
Add Comment