Beed News: …तर बिनलग्नाच्या तरुणांचे लग्न लावून देईन; शरद पवारांच्या उमेदवाराचं लग्नाळूंना अजब आश्वासन

Beed News: मी परळीचा आमदार झाल्यावर मी बिनलग्नाच्या तरुणांची लग्न लावून देईन, असं आश्वासन परळी विधानसभा मतदासंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार यांनी दिले.

महाराष्ट्र टाइम्स
rajesaheb

म. टा. प्रतिनिधी, बीड : ‘बीड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी मतदारसंघात कुठलाही उद्योगधंदा आणला नाही. मोठा उद्योग व्यवसाय उभारला नाही. त्यामुळे तरुणाईला रोजगार नाही आणि रोजगार नाही म्हणून लग्न होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, मी परळीचा आमदार झाल्यावर मी बिनलग्नाच्या तरुणांची लग्न लावून देईन,’ अस आश्वासन परळी विधानसभा मतदासंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख म्हणाले.

परळी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांच्या या आश्वासनंतर उपस्थित तरुणांनी एकच जल्लोष केला. राजेसाहेब देशमुख म्हणाले, ‘केंद्रामध्ये २०१४ मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे. मी जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती होतो. विद्यमान खासदार बजरंग सोनवणे हेही जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. एकाही डीएड-बीएडच्या तरुणांचे शिक्षक म्हणून अप्रुव्हल निघत नाही.’ ‘मी परळीचा पाहुणा आहे. इथे अनेकदा आल्यानंतर समाजात अनेक जण विचारतात मुलाला नोकरी आहे का? आता सरकार नौकरी देत नाही यात तरुणाची काय चूक?’ असा सवाल राजेसाहेब देशमुख यांनी केला.
Chhatrapati Sambhajinagar: गर्लफ्रेण्डसोबत पळाला, मग खुनी खेळ, या बॉयफ्रेण्डचा कारनामा पाहून पोलीसही हादरले
इथल्या पालकमंत्र्यांनी या परिसरात काही उद्योग उभारला नाही. त्यामुळे इथल्या तरुणाच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या लग्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मी सर्व बिगरलग्नाच्या पोरांना आज आश्वासन देतो की मी परळीचा आमदार झालो तर सर्व पोरांचे लग्न करू, असे राजेसाहेब देशमुख म्हणाले.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpDed Bedmva govtncp sharad power groupNCP Sharadchandra Pawarparali vidhan Sabhaपरळी विधानसभा मतदासंघबीड बातम्या
Comments (0)
Add Comment